Kartik Aaryan 
Latest

Kartik Aaryan : कार्तिकच्या आईने कॅन्सरशी दिला लढा; मात केल्यानंतरची पोस्ट व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) सध्या खूपच कठीण काळातून जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कार्तिकने त्याची आई कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता त्याने आनंदाची माहिती देत आईने धैर्याने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कर्करोगावर मात केल्याचे सांगितले आहे. याबाबतची कार्तिकने भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कार्तिक आर्यनने ( Kartik Aaryan ) त्याच्या इंन्स्टाग्रामवर आई माला तिवारीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमधून आईने धैर्याने कर्करोगावर ( कॅन्सर ) मात कशी केली आहे यांची माहिती दिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, 'काही दिवसापूर्वी Big C – नावाचा कॅन्सर' आमच्या घरात घुसला आणि आमच्या कुटुंबाला खूपच त्रास सहन करावा लागला. माझ्या आईला कॅन्सर जडला. त्यामुळे खूपच कठीण परिरिस्थितीचा सामना करावा लागला. दरम्यान आम्ही हताश, निराश, असहाय बनलो होतो. परंतु, माझी आई खूपच खंबीर आणि धाडसी होती. आईने इच्छाशक्तीच्या जोरावर धैर्याने या आजारावर मात केली. आम्ही पूर्ण हिंमतीने आणि ताकदीने ही लढाई लढलो आणि शेवटी जिंकलो.'

यापुढे कार्तिकने सांगितले की, 'या कठिण परिस्थीतवरून एक गोष्ट लक्षात आली की, कुटुंबाच्या प्रेमाने आणि पाठिंब्यामुळे कोणत्याही परिस्थीतीचा सामना करता येतो. Super Hero Cancer Warrior.' असे पोस्टमध्ये लिहिले आहे.

कार्तिकची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी मालाच्या धैर्याचे कौतुक करत अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी 'जय माता दी…', विक्की कौशलने हार्टवाले इमोजी आणि दर्शन कुमारने हात जोडून एक इमोजी शेअर केला आहे. एकता कपूरने 'त्याच्यावर खूप प्रेम.' कार्तिकचा शेहजादा सह-कलाकार रोनित रॉयने 'देव आशीर्वाद दे. प्रणाम प्रेम आणि मॅडमला शुभेच्छा.' असे लिहिले आहे. तर एका युजर्सने 'खरी सुपरव्हुमन. आर्यनची आई सुरक्षित आणि आनंदी राहो.' दुसऱ्या एका युजर्सने 'आंटी जी को बहुत प्यार है.' असे लिहिले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT