Kartik aryan -pushmina  
Latest

Kartik Aaryan : ऋतिक रोशनची बहिण पश्मीनाला डेट करतोय कार्तिक?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला आहे. 'शहजादा'चा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. फ्रेडी आणि शहजादा दोन्ही चित्रपटात कार्तिकचा एक वेगळा अवतार पाहायला मिळतोय. कार्तिकच्या प्रोफेशनल लाईफ शिवाय तो त्याच्या पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत आहे. (Kartik Aaryan) काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनचं नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशी संबंधित होतं. पण आता त्यांचं नाव ऋतिक रोशनची बहिण (कजिन) पश्मीना रोशनसोबत जोडलं जात आहे. (Kartik Aaryan)

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे की, कार्तिक आर्यन पश्मीना रोशनला डेट करत आहे. आता कार्तिक आर्यनने या चर्चांवर मौन सोडलं आहे. एक मुलाखतीत कार्तिक आर्यनने म्हटलं की, 'आता मला ही गोष्ट माहिती झालीय की, मी सेलेब आहे आणि माझे जीवन प्रत्येक गोष्टीत चर्चेत येईल. जर कुणासोबत मैत्री असेल तर त्याला देखील रिलेशनशीपचं नाव दिलं जाईल. पण, यामुळे अनेक अडचणी येतात. आता मला या गोष्टींमुळे फरक पडत नाही. मी माझ्या कामावर फोकस करत आहे.'

कार्तिक म्हणाला, 'जेव्हा माझ्याबाबतीत वाईट बोललं जात होतं, तेव्हा मला फरक पडतो. वास्तवात तसं काही नसतं. मी आता स्वत: या सर्व अफवांबद्दल ओके राहायचं शिकलो आहे. कारण मी जाणतो की, चित्रपट स्टारच्या लाईफमध्ये काहीही पर्सनल नाही. आता मी सर्व काही ओळखलं आहे.'

कार्तिक आर्यन 'फ्रेडी'मध्ये अलाया एफ सोबत दिसणार आहे. यामध्ये एका वेगळ्या भूमिकेत असेल. चित्रपटाता एका सोज्वळ चेहऱ्यामागे एक खतरनाक चेहरा लपलेला आहे. हा चित्रपट २ डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम असणार आहे. याशिवाय 'शहजादा'मध्ये कृती सेनॉनसोबत तो दिसणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT