पिंपरी : महिलेची 79 लाख रुपयांची फसवणूक | पुढारी

पिंपरी : महिलेची 79 लाख रुपयांची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  सौरऊर्जा प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी 79 लाख रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी आणि पुणे परिसरात घडला.
विद्याधर काशिनाथ जोशी (रा. कर्वेनगर, पुणे), परेश शहा (रा. बोरिवली, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फिर्यादी महिलेला सौरऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे आमिष दाखवले. पाच कोटी कर्जासाठी दोन लाख रुपये चार्ज याप्रमाणे 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी महिलेकडून 79 लाख रुपये आरोपींनी घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज मंजूर करून न देता तिची फसवणूक केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button