सांगली येथे कर्नाटकमध्ये जाणारी बस वाहतूक थांबवली : सीमा भागात तणाव | पुढारी

सांगली येथे कर्नाटकमध्ये जाणारी बस वाहतूक थांबवली : सीमा भागात तणाव

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील गावे कर्नाटकमध्ये घेणार, असा दावा केल्यानंतर दोन्ही राज्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. सीमा भागातील गावांमध्‍ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभमीवर आज (शनिवार) सांगली जिल्ह्यात कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाणारी बस वाहतूक थांबवण्यात आली. पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात बस घेऊन जाण्याची तयारी दर्शवलेली आहे.

दरम्यान, बस वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बस या कर्नाटकातील सीमेवरील गावातूनच परत येत आहेत. मात्र या मार्गावर कोठेही दगडफेक झालेली नाही, असे पोलीस आणि एसटी वाहतूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Back to top button