(Kartik Aaryan) 
Latest

Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने नाकारली तब्बल ९ कोटींची ‘ही’ जाहिरात

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते चित्रपटांशिवाय जाहिरातीतूनही मोठी कमाई करत असतात. आजवर कपड्यांपासून गाड्यांपर्यंत अनेक जाहिरातींतून अभिनेत्यांनी मोठी कमाई केली आहे. यामध्ये अजय देवगन, शारूख खान आणि अक्षय कुमार यांनी गुटख्यांच्या जाहिराती करत कोट्यावधी रूपयांची कमाई केली होती. पण बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने गुटख्याची करोडो रूपयांची जाहिरात नाकारली आहे. (Kartik Aaryan)

सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिक आर्यनला या जाहिरातीसाठी करोडो रूपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र कार्तिक आर्यनने ही जाहिरात स्पष्ट शब्दांत नाकारली आहे. गुटख्याची जाहिरात नाकारल्याने त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने चाहत्यांच्या आरोग्याचा विचार करत ही जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे. या जाहिरातीसाठी कार्तिक आर्यनला ९ कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळे सेंसॉर बोर्डाचे माजी चेअरमन पहलाज निहलानी यांनीही कार्तिकचे कौतुक केले आहे. (Kartik Aaryan)

या अगोदर अजय देवगन, अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि अक्षय कुमार यांनी गुटख्याची जाहिरात केल्याने त्यांना सोशल मीडीयावर ट्रोल करण्यात आले होते. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला माफी मागावी लागली होती. कार्तिक आर्यनच्या 'भुल भुलैय्या' या सिनेमाने मोठी कमाई केली होती. त्यानंतर कार्तिकला अनेक जाहिरातींच्या ऑफर येत आहेत.   (Kartik Aaryan)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT