Latest

Karnataka Teacher Suspend : उडुपीत विद्यार्थ्यास दहशतवादी म्हटल्याप्रकरणी प्राध्यापक निलंबीत

अमृता चौगुले

बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : उडुपी येथील मनिपाल विद्यापीठातील प्राध्यापकावर विद्यार्थ्यास दहशतवादी म्हटल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली. या सर्व घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राध्यपकावर कारवाई करण्यात आली. प्राध्यापकाने विद्यार्थ्याची तुलना दहशतवाद्यांशी केल्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रतित्युतर दिले. यावेळेचा व्हिडिओ विद्यार्थ्यांकडून बनविण्यात आला आणि तो लगेत इंटरनेटवर अपलोड करण्यात आला. या नंतर बघता बघता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरला झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २५) घडली. (Karnataka Teacher Suspend)

प्राध्यापकाने विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारले आणि एक मुस्लिम नाव ऐकून शिक्षक म्हणाला, "अरे, तू कसाबसारखा आहेस!" मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्यी प्राध्यापकाशी वाद घालताना आणि त्याची तुलना दहशतवादाशी करून त्याच्या धर्माची बदनामी केल्याचा आरोप करताना दिसतो. (Karnataka Teacher Suspend)

"26/11 हा काही चेष्टेचा विषय नाही. या देशात मुस्लिम असल्याने या सर्व गोष्टींना दररोज सामोरे जावे लागते. सर तुम्ही माझ्या धर्माची चेष्टा करू शकत नाही." असे म्हणत तो विद्यार्थी त्या शिक्षकास म्हणाला, 'तुम्ही इतक्या लोकांसमोर असे कसे बोलू शकता.' (Karnataka Teacher Suspend)

यानंतर त्या प्राध्यापकाने संबधित विद्यार्थ्यांची माफी मागतली तसेच तू माझ्या मुलाप्रमाणे असल्याचे म्हटले. पण, यावर तो विद्यार्थी म्हणाला, 'माफी मागून तुम्ही कसे विचार करता आणि तुम्ही स्वत:ला कसे इतरांसमोर प्रस्तुत करता हे बदलू शकत नाही. आता मला तुम्ही मुलासारखे असल्याचे म्हणत आहात मग, घरात तुम्ही तुमच्या मुलाला दहशतवादी म्हणून संबोधतता का?' म्हणत शिक्षकास खडे बोल सुनावले. (Karnataka Teacher Suspend)

या सर्व घटनेवर मनिपाल विद्यापीठाच्या प्रशासनाने सांगितले की, या गंभीर घटनेची दखल घेत विभागीय स्तरावर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणी संबधित विद्यार्थ्यांशी सुद्धा चर्चा केली जाईल, अशी माहिती शिक्षण संस्थेकडून देण्यात आली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT