बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : अथणी, बेळगाव ग्रामीण, चिकोडी, यमकनमर्डी येथील उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाच उमेदवारांपैकी दक्षिण मधून रमाकांत कोंडुसकर यांचा पराभव झाला असून बेळगाव ग्रामीण मधील आर.एम.चौगुले हे देखील पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. येथून काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मताधिक्य कापणे ही अशक्यप्राय आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अथणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे लक्ष्मण सवदी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. ते 35, 928 इतक्या मतांनी पुढे आहेत. चिकोडीमधून काँग्रेसचे गणेश हुक्केरी 42 हजार मतांनी पुढे आहेत, तर कुडची मतदार संघातून महेश तमन्नावर 19762 मतांनी पुढे आहेत. बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या 33 हजार मतांनी पुढे आहेत. येथे दुसऱ्या क्रमांकावर असलेले मए समितीचे आर.एम. चौगुले यांना 34825 मते मिळाली आहेत. तर हेब्बाळकर यांना 71336 मते मिळाली आहेत. यमकनमर्डी येथून सतीश जारकीहोळी 45000 मतांनी आघाडीवर आहेत.
बेळगाव दक्षिण मधून भाजपचे आमदार अभय पाटील हे 11 हजार 762 इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना 76,249 मते मिळाली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना 64,487 मते मिळाली आहेत.
हेही वाचा :