कर्नाटक राज्यातील मतदान यंत्रांचे थेट आफ्रिकेशी कनेक्शन? : काँग्रेसचा आरोप | पुढारी

कर्नाटक राज्यातील मतदान यंत्रांचे थेट आफ्रिकेशी कनेक्शन? : काँग्रेसचा आरोप

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  10 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आलेली ईव्हीएम मशिन यापूर्वी दक्षिण अफ्रिकेत वापरण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, हा आरोप निवडणूक आयोगाने धुडकावून लावत अशा अफवा पसरवू नयेत, अशी सूचना काँग्रेसला दिली आहे.

र्कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सूरजेवाला यांना पत्र लिहून आयोगाने इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (इसीआयएल) ने तयार केलेली नवीन इव्हीएम कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत वापरली असल्याचे स्पष्ट केले आहे. इव्हीएम दक्षिण अफ्रिकेला पाठवेले नव्हते, निवडणूक आयोगाने इव्हीएम कोणत्याही देशातून आयात केेलेले नाहीत, शिवाय, दक्षिण अफ्रिकेतील निवडणुकांमध्ये इव्हीएम वापरलेेच जात नाही, हे दक्षिण अफ्रिकेच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तसेच राष्ट्रीय व प्रांतीय निवडणूक पुस्तिकेतही नमूद आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

इव्हीएमविषयी खोटी माहिती पसरविणारा स्रोत (सोर्स) पक्षाने जाहीर करावा. तसेच 15 मे रोजी सायंकाळी 5 च्या आत काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचनाही निवडणूक आयोगाने केली आहे.

Back to top button