kareena kapoor  
Latest

Kareena Kapoor Video : फिटनेस फ्रीक करिनाने बिर्याणीवर मारला ताव

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची दिवा करीना कपूर खूप चर्चेत आहे. नुकताच करीना कपूर (Kareena Kapoor Video) आणि बहीण करिश्मा कपूर आणि मुलांसोबत व्हेकेशनला गेली होती. तेथील तिने आपले व्हेकेशन फोटो शेअर केले होते. करीना आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिने तिचा बिर्याणी खातानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे फिटनेस फ्रिक असलेल्या करीनाने बिर्याणीवर कसा ताव मारलाय पहा. (Kareena Kapoor Video)

करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मंडे ब्लूज बिर्याणी…आतापासूनचं उद्याचा डेजर्ट प्लॅन करत आहे."

व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, बिर्याणी पाहून बेबो स्वत:वर नियंत्रण नाही ठेवू शकत. पटकन ती प्लेटमध्ये बिर्याणी घेते आणि बिर्याणीवर ताव मारताना दिसते. करीनाचा हा फूडी अवतार फॅन्सना आवडत आहे.

फिटनेस फ्रीक करीनाचा हा फूडी अंदाज समोर आलाय. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय. व्हिडिओवर फॅन्ससोबत सेलेब्रिटीजदेखील कमेंट करत आहेत. बिर्याणीचा व्हिडिओ पाहून तिची बहिण करिश्माने कमेंट दिलीय. तिने लिहिल, 'मी या बिर्याणीला मिस केलं.'

सेलेब्सच्या तोंडात आलं पाणी

करीनाचा हा व्हिडिओ सेलेब्सच्या तोंडात पाणी आलं. त्यांनी एका मागोमाग कमेंट केले आहेत. करीनाला बिर्याणी खाताना पाहून मलायका अरोराने कमेंट केलं आहे की- बेबो जेव्हा मी परत येईन तेव्हा मला हवं. ड्रामा क्वीन राखी सावंतने लिहिलंय- Woow muje Bhie do ????.

करीनाने आपल्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलीय. ती नेटफ्लिक्सचा चित्रपट करत आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहे. करीना शेवटी २०२० मध्ये 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय, ती 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT