World Cup 2023 
Latest

Kapil Dev on IPL : आयपीएलबाबत कपिल देव यांचा थेट सल्‍ला,” दबावाखाली क्रिकेट..”

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय  क्रिकेट संघाचे माजी कर्णधार  कपिल देव यांनी आयपीएलबाबत मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या ३९ वर्षांत क्रिकेटचे रूप खूप बदलले आहे. आता कसोटी आणि एकदिवसीय व्यतिरिक्त टी-२० फॉरमॅटही सुरू झाला आहे. सर्व खेळाडू आपापल्या देशासाठी खेळतात तसेच टी-२० लीगही खेळतात. अशा परिस्थितीत आयपीएलसारख्या लीगच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंवर खूप दडपण असते. (Kapil Dev on IPL) मात्र, खेळाडूंनी दबावाखाली क्रिकेट खेळू नये, असे कपिल देव यांनी म्‍हटलं आहे.

 'चॅम्पियन्स ऑफ आकाश 2022' या कार्यक्रमात बाेलताना कपिल देव म्‍हणाले, " मी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हाचा काळ आणि आत्ताचे क्रिकेट यामध्ये फार फरक आहे. त्यामुळे जर खेळाडूंना आयपीएल खेळल्यामुळे दडपण येत असेल तर त्यांनी ही लीग खेळू नये.
मी आजकाल खूप ऐकतो की, लोक म्हणतात, ' मी दबावात आहे, आम्ही आयपीएल खेळतो, खूप दबाव आहे'. मी तेच सांगतो. 'खेळू नको'. हे काय दडपण काय आहे? जर तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडत असेल तर कोणतेही दडपण नसावे." (Kapil Dev on IPL)

दबाव, डिप्रेशन हे अमेरिकेतून आलेले शब्द आहेत. मला हे शब्द कधी समजलेच नाहीत. मी शेतकरी कुटुंबातून आलो. त्यामुळे दबाव आणि दडपण काय असत ते मला माहित नाही. आम्ही क्रिकेट मौजमज्जेसाठी क्रिकेट खेळलो. आनंदासाठी खेळलो. जिथे आनंद आहे तिथे दबाव असूच शकत नाही, असा सल्‍लाही त्‍यांनी युवा क्रिकेटपटूंना दिला.

हेही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT