kojol  
Latest

kojol : जाडी म्हटल्यानं भडकली काजोल; थेट फोटो टाकत नेटकऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण ( kojol ) गेल्या काही दिवसांत बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीला पोहोचली होती. या पार्टीत काजोलने अनेक स्टार्ससोबत धमाकेदार परफॉर्मन्स केला होता. यानंतर मात्र, काजोलला तिच्या दिसण्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. सध्या काजोलने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांनी चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत काजोलने चमकणारा ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान करून एन्ट्री केली. यानंतर पार्टीला आलेल्या मान्यवर, बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्ससोबत धमाकेदार परफॉर्मन्स केला. या डान्सचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. परंतु, नेटकऱ्यांनी तिला 'खूपच जाडी दिसतेय',' कोणत्याच चित्रपटाचे दिसत नाही' असे म्हणून ट्रोल करण्यास सुरूवात केली. आता काजोलने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

याच दरम्यान अभिनेत्री काजोलने ( kojol ) तिच्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत काजोलच्या हातात एक छोटा कॉफी मग दिसत आहे. या कॉफी मगावर मोठ्या ठळक अक्षरात 'size matters' असे लिहिले आहे. तर हा फोटो शेअर करताना तिने 'कॅप्शनची गरज नाही.' असे म्हटले आहे. यावरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना दिसण्याचा किंवा जाड असण्याचा अजिबात फरक पडत नसल्याचे दर्शवायचे आहे. यानंतर मात्र, नेटकऱ्यांची बोलती बंद झाली आहे.

याशिवाय काजोल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून तिचे हॉट फोटोज पाहायला मिळतात. काजोल सध्या एक 'सुजाता' नावाच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. परंतु, या प्रोजेक्टबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्री शेवटची 'तान्हाजी' चित्रपटामध्ये पती अजय देवगणसोबत दिसली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT