HBD Juhi Chawla  
Latest

HBD Juhi Chawla : जुहीच्या वडिलांनी लग्नासाठी सलमानला दिला होता नकार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची उत्तम अदाकारा जुही चावलाचा (HBD Juhi Chawla) आज १३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. जुहीचा जन्म १३ नोव्हेंबर, १९६७ रोजी अंबाला (हरियाणा) मध्ये झाला होता. तिने १९८४ मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. ब्युटी पेजेंटमध्ये यश मिळवल्यानंतर जुही बॉलीवूडकडे वळली. जूहीने १९८७ मध्ये चित्रपट 'सल्तनत'मधून डेब्यू केलं होतं. यानंतर जुहीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. (HBD Juhi Chawla)

सलमान खान आणि जुही चावला अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. मात्र, त्यांनी एकत्र काम केलेल्या प्रत्येक चित्रपटात त्यांचा फक्त कॅमिओ होता. 'दीवाना मस्ताना' चित्रपटात जुही आणि सलमानचे लग्नही झाले होते. पण सलमानचे हे स्वप्न खऱ्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सलमानला जुही चावलासोबत लग्न करायचे होते.

सलमान एकदा म्हणाला- 'जुही खूप गोड आहे. मी त्याच्या वडिलांनाही विचारले होते की, तुम्ही जुहीला माझ्याशी लग्न करू द्याल का? पण त्यांनी नकार दिला. कदाचित त्यांना मी आवडत नसावे. त्यांना कोणत्या प्रकारचा मुलगा हवा होता हे माहित नव्हते?

जुही चावलाने १९९७ मध्ये बिझनेसमन जय मेहताला आपला पार्टनर बनवले, ते जुहीपेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत. जुहीची इच्छा असती तर ती सहकलाकाराशी लग्न करू शकली असती. पण तिने नॉन फिल्मी व्यक्तीला आपला जीवनसाथी बनवणं पसंत केलं. दोघांची ओळख राकेश रोशनने करून दिली होती.

जुही चावलाची फिल्मी कारकीर्द

जुहीने १९८६ मध्ये 'सुलतनत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दोन वर्षांनंतर ती 'कयामत से कयामत तक' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात त्याच्यासोबत आमिर खान होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि जुही रातोरात स्टार बनली. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT