पुढारी ऑनलाईन डेस्क : "हसावे का रडावे कळत नाही; ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो. आणि बळाचा वापर करुन दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हातावर हात ठेऊन बसले आहेत" असा टोमणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला मारला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात बरीच स्थित्यांतर आली. अलिकडे महाराष्ट्रातील वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपकडून महापुरुषांचा होणारा अवमान, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची चिथावणीखोर भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाणे आणि लोकशाहीचे रक्षण आदी मुद्द्यांवर आज मुंबईत महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हा मोर्चा काढला जात असून त्याने सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. शुक्रवारी पोलिसांनी काही अटी, शर्तीसह या मोर्चाला परवानगी दिली आहे. मुंबईत भायखळा ते आझाद मैदान (क्रुडास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत) असा महामोर्चाचा मार्ग असणार आहे. सत्तांतरानंतरचा विरोधकांचा हा पहिलाच एकत्रित मोर्चा असेल. तर भाजपकडूनही 'माफी मांगो आंदोलन' केलं जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा मारला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचा महामोर्चा आज आहे तर दुसरीकडे भाजपाकडून 'माफी मांगो आंदोलन' केलं जाणार आहे. हे आंदोलन ठाणे-डोंबिवलीत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी एक खोचक ट्विट केलं आहे, त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "हसावे का रडावे कळत नाही; ज्या शहरात मुख्यमंत्री स्वतः राहतात त्याच शहरात त्यांचा पक्ष बंद पुकारतो. आणि बळा चा वापर करुन दुकान रिक्षा बस बंद करत आहेत आणि पोलिस हातावर हात ठेऊन बसले आहेत"
हेही वाचा