Japan’s Private Satellite 
Latest

पाहा व्हिडिओ! जपानच्या पहिल्या खासगी रॉकेट प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच स्फोट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानचे पहिले खासगी रॉकेट आज सकाळी प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच स्फोट होऊन नष्ट झाले. हे रॉकेट हवेतच बेचिराख झाले. राॅकेटचा स्फोट झाल्याचे लक्षात येताच, स्प्रिंकलरने पाणी फवारण्यास सुरुवात केली. पण रॉकेट आणि उपग्रहाचे जळणारे अवशेष आजूबाजूच्या डोंगरावर पडताना दिसले. या संदर्भातील वृत्त 'NDTV'ने दिले आहे. (Japan's Private Satellite)

एका जपानी कंपनीने बनवलेले रॉकेट बुधवारी (दि.१३) पहिल्यांदाच प्रक्षेपित केल्यानंतर हवेत असताना लगेचच त्याचा स्फोट झाला. सार्वजनिक प्रसारक NHK ने रॉकेट अपयशाचे फुटेज जारी केले आहेत. टोकियो-आधारित स्टार्टअप 'स्पेस वन' हा उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत ठेवणारी पहिली जपानी खासगी कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवत होती. मात्र मोहिमेदरम्यान हवेतच उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटचा स्फोट झाल्याने निराशा पदरी पडली आहे. (Japan's Private Satellite)

जपानचा हा खाजगी उपग्रह घन-इंधन कैरोस रॉकेट पश्चिम जपानमधील वाकायामा प्रीफेक्चरमधील स्टार्टअपच्या स्वतःच्या लॉन्च पॅडवरून 18-मीटर (60-फूट) उडून गेले. परंतु प्रक्षेपणानंतर काही सेकंदांनंतर रॉकेट ज्वालाच्या बॉलमध्ये फुटले आणि लॉन्च पॅडच्या परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. स्प्रिंकलरने पाणी फवारण्यास सुरुवात केल्याने जळणारा ढिगारा आजूबाजूच्या डोंगर उतारांवर पडताना दिसत होता. (Japan's Private Satellite)

rocket explodes
Japan's first private rocket explodes

Japan's Private Satellite:'Space One'विषयी थोडक्यात…

Space One ची स्थापना 2018 मध्ये कॅनन इलेक्ट्रॉनिक्स, IHI एरोस्पेस, बांधकाम फर्म शिमिझू आणि सरकारी मालकीची डेव्हलपमेंट बँक ऑफ जपान यासह प्रमुख जपानी टेक व्यवसायांच्या टीमने केली होती. गेल्या जुलैमध्ये दुसऱ्या जपानी रॉकेट इंजिनचा प्रज्वलन झाल्यानंतर सुमारे 50 सेकंदांच्या चाचणी दरम्यान स्फोट झाला. सॉलिड-इंधन एप्सिलॉन एस ही एप्सिलॉन रॉकेटची सुधारित आवृत्ती होती जी मागील ऑक्टोबरमध्ये प्रक्षेपित करण्यात अयशस्वी झाली होती.

हे ही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT