पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने बोल्ड फोटोशूट केल्याने तिची चर्चा होताना दिसतेय. जान्हवी कपूर ब्रा आणि शॉर्ट पँटमध्ये तिची टोण्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये जान्हवी कपूरचा बोल्डनेस कोणाच्याही नजरेतून सुटणार नाही, असा आहे. (Janhvi Kapoor)
जान्हवी ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे जिने स्वत:च्या बळावर फार कमी वेळात फिल्म इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. आज जान्हवी केवळ तिची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीमुळेच नाही तर तिच्या स्वत:च्या नावानेही प्रसिद्ध आहे.
जान्हवी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिचा नवीन फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही अभिनेत्रीचे फॅन फॉलोईंग वाढत चालले आहे. आता जान्हवीने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.
फोटोंमध्ये जान्हवी पांढरा ब्रालेट आणि डेनिम शॉर्ट्स परिधान करताना दिसत आहे. यादरम्यान ती तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दाखवत आहे. तिचा लूक कम्प्लिट करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर किलर लूक दाखवताना दिसत आहे. आता हा लूकही जान्हवीच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत. चाहते सतत कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.
जान्हवी लवकरच 'रणभूमी', 'तख्त', 'गुड लक जेरी', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल'मध्ये दिसणार आहे.
हेदेखील वाचा –