Latest

James Webb Space Telescope : ‘जेम्स वेब’ने शोधला सौरमालेबाहेर पहिला पृथ्वीसदृश ग्रह!

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (James Webb Space Telescope) आता सौरमालेबाहेर पहिला पृथ्वीसदृश ग्रह शोधला आहे.  LHS 475 b वर्गामधील असणाऱ्या या ग्रहाचा व्यास जाळपास पृथ्वीइतकाच असून पृथ्वीपासून याचे अंतर फक्त ४१ प्रकाश वर्ष म्हणजेच १५,००,००० किमी आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने यापूर्वी आठ व दहा अब्ज वर्षांपूर्वीच्या दोन आकाशगंगा शोधल्या आहेत.

या ग्रहावर खास काय आहे?

नव्याने सापडलेल्या या पृथ्वीसदृश ग्रहावर वातावरण असू शकते पण ते पृथ्वीप्रमाणे असण्याची तसेच शनीच्या टायटन या उपग्रहप्रमाणे मिथेनचे वातावरण असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी नाकारली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रहावर २ दिवसाचे वर्ष आहे, म्हणजेच हा ग्रह त्याच्या सूर्याभोवती २ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मुळात हा ग्रह त्याच्या सूर्याच्या अतिशय जवळ असूनही त्यावर वातावरण अस्तित्वात  असावे, असा संशोधकांचा अंदाज आहे.  याचे कारण म्हणजे या ग्रहावर सूर्यापेक्षा अर्ध्याहून कमी तापमान आहे. सध्या शास्त्रज्ञांकडून या ग्रहाच्या खडकांचा अभ्यास सुरू असून, जगभर पृथ्वीसदृश ग्रह सापडल्याने अंतराळ संशोधकांमध्‍ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे James Webb Space Telescope ?

नासाने अंतराळामध्ये नवे ग्रह शोधण्यासाठी निर्माण केलेल्या 'जेम्स वेब' टेलिस्कोपला पृथ्वी सदृश ग्रह शोधण्याचे महत्वाचे काम देण्यात आले आहे. म्हणजेच या टेलिस्कोपमध्ये पृथ्वीप्रमाणे वातावरण आणि आकारमान असलेले ग्रह टिपण्याची खास क्षमता आहे. यापूर्वी या टेलिस्‍कोपने आठ व दहा अब्ज वर्षांपूर्वीच्या दोन आकाशगंगा शोधल्या आहेत.आकाशगंगांना अनुक्रमे 'आरएस13' आणि 'आरएस14' अशी नावे देण्यात आली आहेत. अर्थात, यापूर्वीही या आकाशगंगा शोधण्यात आल्या होत्या. हबल स्पेस टेलिस्कोप व स्पिटझर स्पेस टेलिस्कोपनेही या आकाशगंगा शोधल्या होत्या; मात्र त्यांची मर्यादित रिझोल्युशन रेंज आणि सेन्सिटिव्हिटी यामुळे आकाशगंगांचा आकार व वैशिष्ट्यांवर अभ्यास करणे अशक्य होते.

अधिक तांत्रिक माहितीसाठी व फोटोंसाठी पुढील इमेजवर क्लिक करा. 

हेही  वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT