James Webb Space Telescope  
Latest

James Webb Space Telescope : ‘जेम्स वेब’ने शोधली 10 अब्ज वर्षांपूर्वीची आकाशगंगा

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (James Webb Space Telescope) आता 8 व 10 अब्ज वर्षांपूर्वीच्या दोन आकाशगंगा शोधल्या आहेत. दुसरी आकाशगंगा ही पृथ्वीपासून 19 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. दोन्ही आकाशगंगांचा रंग लालसर आहे. या दोन्ही आकाशगंगा आपल्या 'मिल्की वे' या आकाशगंगेप्रमाणेच 'स्पायरल' म्हणजेच सर्पिलाकार आहेत.

ब्रह्मांडात 'स्पायरल गॅलेक्झी' (James Webb Space Telescope) हा आकाशगंगांचा एक सर्वात सामान्य असा प्रकार आहे. बहुतांश आकाशगंगा अशाच आकाराच्या असतात. त्या नेहमी सक्रिय असतात आणि त्यांच्यामध्ये नव्या तार्‍यांची निर्मिती होत असते. अनेक आकाशगंगांचा रंग निळसर असतो व त्याचे कारण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईटमध्ये (अतिनील प्रकाशात) नवे तारे चमकतात. अर्थात, काही आकाशगंगा लाल रंगाच्याही असतात. त्यांच्यामधील तारे जुने झालेले असतात आणि त्या मोठ्या प्रमाणात वायूने घेरलेल्या असतात.

आता जेम्स वेब (James Webb Space Telescope) अंतराळ दुर्बिणीने शोधलेल्या आकाशगंगांना अनुक्रमे 'आरएस13' आणि 'आरएस14' अशी नावे देण्यात आली आहेत. अर्थात, यापूर्वीही या आकाशगंगा शोधण्यात आल्या होत्या. हबल स्पेस टेलिस्कोप व स्पिटझर स्पेस टेलिस्कोपनेही या आकाशगंगा शोधल्या होत्या; मात्र त्यांची मर्यादित रिझोल्युशन रेंज आणि सेन्सिटिव्हिटी यामुळे आकाशगंगांचा आकार व वैशिष्ट्यांवर अभ्यास करणे अशक्य होते.

आता जेम्स वेब टेलिस्कोपने (James Webb Space Telescope) या समस्या दूर केल्या आहेत. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, लाल रंगाच्या स्पायरल गॅलेक्झी पाहणे हे अतिशय दुर्लभ आहे. याचे कारण म्हणजे अशा स्पायरल गॅलेक्झी केवळ 2 टक्केच असतात. विशेष म्हणजे, 'आरएस13' आणि 'आरएस14' या दोन्ही आकाशगंगा एकाच प्रतिमेत कैद झाल्या आहेत. 'आरएस14' ही आकाशगंगा दहा अब्जांपेक्षाही अधिक वर्षांपूर्वी बनू लागली होती. ब्रह्मांडाच्या विस्तारामुळे आज ती आपल्यापासून 19 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. अशा प्रकारच्या आकाशगंगांच्या शोधामुळे ब्रह्मांडाची अनेक रहस्ये व त्याच्या विस्ताराबाबत जाणून घेण्यास मदत मिळते. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'द अ‍ॅस्ट्रोफिजिकल' जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे.

हेही वाचा :  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT