जळगाव; पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. चाळीसगाव शहराचे भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर दोघांनी गोळीबार केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोळीबार झाला असून पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर नेहमीच अशा घटनांसाठी केंद्रबिंदू राहिलेले आहे. प्रतिबंधक गुटखा विक्रीच्या प्रकारातही या शहराचे नाव मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशातच, रेल्वे स्टेशन सिंधी कॉलनी येथे माजी नगरसेवक महेंद्र मोरे उर्फ बाळासाहेब मोरे (दि.7) आपल्या कार्यालयात बसलेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन अज्ञातांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांनाा दोन ते तीन गोळ्या लागल्याचे समजते.
घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. बाळासाहेब मोरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा झालेल्या गोळीबारामुळे पोलिसांचा धाक संपलेला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :