जुन्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपीस अटक केली आहे.
याबाबत भुसावळ तालुका पोलिस स्थानकात आकाश शांताराम शेळके (२५, रा. फेकरी, वाल्मिकनगर, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा लहान भाऊ मंगल शांताराम शेळके (२३) याच्यासोबत पूर्वी झालेला वाद उकरुन काढत संशयित राहुल तुकाराम पाडळे (२८, मु.पो. फेकरी, ता. भुसावळ) याने मंगलची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ केली. तसेच त्याच्याशी झटापट करत असताना त्याला चालत्या दुचाकीवर (क्रमांक एम.एच.१९ ई.बी. २०२४) जबरदस्तीने बसवत नंतर जोराने ढकलून दिल्याने तो फेकरी उड्डाणपुलाखाली दुचाकीवरून पडल्याने त्यास जबर दुखापत होवून मेंदूला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी संशयित राहुल तुकाराम पाडळे यास अटक केली आहे. आरोपीस कोर्टात हजर केले असता २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पर्यवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी करीत आहेत.
हेही वाचा:
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.