Latest

Jacqueline Fernandez : जॅकलिनचे इंन्स्टाग्रामवर ६० मिलियन फॉलोअर्स

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : श्रीलंकन ​​ब्युटी क्वीन म्हणजे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिच्या अभिनयासोबत स्टायलिश, बोल्ड लूकने नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. यामुळे जॅकलिनचे सध्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर ६० मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहे. यानिमित्ताने जॅकलिनने केक कापून आनंद साजरा केला आहे.

जॅकलिनला सोशल मीडिया नेहमी सक्रिय असल्याने तिला नेटकऱ्यांनी ब्युटी क्वीन असे म्हटले आहे. सोशल मीडियावर जॅकलिन वेगवेगळ्या स्टाईलचे आणि अंतरंगी फोटोशूट करून चर्चेत असते. चाहत्यांना तिच्या हटके फोटोंनी नेहमीच भूरळ पडली आहे. जॅकलिन सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. ती अंतरंगी फॅशनने नव्हे तर सध्या इंन्स्टावर ६० मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. जॅकलिनने ( Jacqueline Fernandez ) हा खास क्षण केक कापून मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. या क्षणाचे तिने काही फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत.

या फोटोत जॅकलिन निळ्या रंगाच्या डेनिममध्ये आनंदीत दिसतेय. यावेळी फोटोत एका टेबलावर ६० असे अंक लिहिलेला एक मोठा केक दिसत आहे. याशिवाय तिच्या पाठीमागे आकर्षण सजावट दिसत आहे. यातील एका फोटोला पोझ देताना जॅकलिनने आपले दोन्ही हात वर करून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'आम्ही ६० दशलक्ष कुटुंब आहोत ?? ♥️, या प्रवासात माझ्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद ? #jf.' असे लिहिले आहे. यावरून जॅकलिनने ६० दशलक्षचा टप्पा पार केल्याचे दिसून येत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका नेहा कक्कडने 'Suuuuper! You deserve even more ♥️?'. तर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने 'So cute my goddess ?❤️ love you moreeeee JF'. अशा कॉमेंन्टस केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी 'Amazing ❤️❤️❤️❤️ congrats beautiful', '?Congratulations ? ????', 'Yayyy❤️'अशा कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही युजर्संनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

इंस्‍टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स केलेल्‍या सेलिब्रिटीच्या यादीमध्‍ये पहिल्या क्रमाकावर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा असून तिचे ७६.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर असून तिचे ७१.२ मिलियन फॉलोअर्स इंन्स्टाग्रामवर आहेत. तर दीपिका पादुकोण (६६ दशलक्ष) चौथ्या क्रमांकावर आणि आलिया भट्ट (६३.९ दशलक्ष) पाचव्या क्रमांकावर आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, जॅकलीन अलिकडे बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या 'अटॅक' आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' चित्रपटात दिसली आहे. तर आगामी 'सर्कस' आणि कन्नड चित्रपट 'विक्रांत रोना' मध्ये ती दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT