Sukesh Chandrashekhar: जॅकलिन आणि नोरा १२वी पास भामट्याच्या जाळ्यात कशा फसल्या? 
Latest

Sukesh Chandrashekhar: जॅकलिन आणि नोरा १२वी पास भामट्याच्या जाळ्यात कशा फसल्या?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar). कोट्यवधीच्या फसवणूक प्रकरणात EDच्या जाळ्यात अडकलेला सुकेश याने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिलेल्या आहेत. त्यातून जॅकलिन आणि नोराचीही चौकशी सुरू आहे. पण नोरा आणि जॅकलिनसारख्या नामवंत अभिनेत्रींना या भामट्याची भूरळ कशी पडली असेल असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

विशेष म्हणजे सुकेश हा १२वी पास आहे. त्याने आतापर्यंत राजकारणी, व्यावसायिक अशा अनेकांना टोप्या घातल्या आहेत. सुकेशला बऱ्याच वेळा अटकही झालेली आहे. पण सुटका होताच तो पुन्हा आपले उद्योग सुरू करत असे. सुकेशने (Sukesh Chandrashekhar) वयाच्या १७व्या वर्षी पहिली फसवणूक केली होती.

सुकेश आहे तरी कोण?

सुकेश (Sukesh Chandrashekhar) मुळात मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. या पठ्ठ्याने १२वीनंतर शिक्षण सोडून दिले. बंगळुरू येथील भवानीनगरचा रहिवाशी असलेल्या सुकेशने सुरुवातीला बांधकाम व्यवसायात नशिब आजमावून पाहिले. वयाच्या १७व्या वर्षी सुकेशने भामटेगिरी सुरू केली. फोनवरून वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा उद्योग त्याने सुरू केला. सरकारी कार्यालयातील कामे करून देतो असे सांगत त्यांने १००लोकांची फसवणूक केली होती. २००७मध्ये त्याला पहिल्यांदा अटक झाली. सुटका झाल्यानंतर त्याने फसवणुकीचा उद्योग सुरूच ठेवला. अजून काही सहकारी सामील करून त्याने स्वतःचे एक रॅकेटच बनवले.

जॅकलिनशी भेट कशी झाली?

सुकेशने मेकअप आर्टिस्ट शान मुट्टाथिलच्या माध्यमातून जॅकलिनला पहिल्यांदा फोन केला. वरिष्ठ सरकारी अधिकारी बोलू इच्छितात, असे सांगत त्याने जॅकलिनशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्रायलाच्या कार्यालयातील फोन नंबर असल्याचे त्याने भासवले होते. त्याने त्याचे नाव शेखर रतन वेला असे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी सुरू झाल्या. आपण सन टिव्हीचे मालक असून जयललिता यांच्या नातेवाईकांपैकी आहोत, अशी बतावणी त्याने केली होती.

एका वृत्तानुसार जॅकलिन सुकेशला (Sukesh Chandrashekhar) तिला हव्या असलेल्या भेटवस्तूंची यादी पाठवायची आणि सुकेश त्या तिला पोहोच करायचा. खंडणीतून मिळालेल्या पैशातून सुकेशने नोरा फतेही हिला बीएमडब्लू कार गिफ्ट दिली होती. सुकेश सध्या तिहार जेलमध्ये असून त्याच्याविरोधात १५ एफआयआर नोंद आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT