vistara flight  
Latest

Vistara Flight : विमानात नशेच्या अवस्थेत कपडे उतरवून गोंधळ घालणा-या महिलेला अटक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अबु धाबीहून मुंबईत येणाऱ्या विस्तारा एअरलाईनच्या फ्लाईट (यूके-२५६) मध्ये एका महिलेने गोंधळ घातला. (Vistara Flight) ही महिला इटलीची राहणारी आहे. या महिलेने फ्लाईटमध्ये कपडे उतरवले आणि इकडे-तिकडे फिरू लागली. तिला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्रू मेंबर्सशी महिलेने हुज्जत घालत मारहाण केली. मुंबईमध्ये फ्लाईट लँड होताच क्रू मेंबरच्या तक्रारीनंतर महिलेला अटक करण्यात आली. (Vistara Flight)

पोलिस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, फ्लाईटमध्ये एका महिलेने नशेत असताना गोंधळ घातला. ही महिला इटलीची रहिवासी आहे. आरोपी महिलेविरोधात तपास पूर्ण केल्यानंतर चार्जशीट दाखल केली आहे. तिला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर महिलेला जामीन देण्यात आला.

बिझनेस क्लासमध्ये बसली होती महिला

या प्रकरणाची आणखी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ही महिला फ्लाईटच्या दरम्यान बिझनेस क्लासमध्ये जाऊन बसली होती. मात्र, तिच्याकडे इकॉनॉमी क्लासचं तिकिट होतं. जेव्हा क्रू मेंबरने तिला आपल्या जागेवर जाण्यास सांगितले, तेव्हा महिलेने हुज्जत घातली. तिने एका क्रू मेंबरला ठोसा लगावला आणि त्याच्यावर थुंकलीही. त्यानंतर महिलेने कपडे उतरवले आणि इकडे-तिकडे फिरु लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT