Latest

चाळीशी पार केलीय; मग निरोगी राहण्‍यासाठी ‘हे’ पदार्थ टाळाच

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपल्‍याकडे पूर्वी डोळ्यावर चष्‍मा आला की,  चाळीशी ओलांडली असे मानले जात होते. मात्र आता जीवनशैली बदलाचा परिणाम आल्‍या जगण्‍यावर एवढा झाला आहे की, चष्‍मा आणि वय हे पूर्वीचे समीकरण राहिलं नाही. जगण्‍याचा वेग एवढा वाढला आहे की, आजरी पडेपर्यंत आपण आपल्‍या शरीराकडे लक्षच देत नाही. मात्र आता बदलत्‍या जीवनशैलीमुळे चाळीशी ओलांडली की, आरोग्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक ठरते. वयाची चाळीशी ओलांडल्‍यानंतर घेतलेल्‍या काळजीमुळे  वृद्धापकाळ सुखकर होतो. निरोगी राहायचे असेल तर सर्वप्रथम आपल्‍याला आहाराकडे लक्ष द्‍यावे लागते. खाण्‍याच्‍या चुकीच्‍या सवयींमध्‍ये बदल करावे लागतात. चला तर मग जाणून घेवूया चाळीशीनंतर कोणते खाद्‍यपदार्थ टाळावेत ते….

चाळीशीनंतर चयापचय क्रियेत बदल होतो. तसेच हार्मोन्‍सही बदल हाेत असताे. विशेषत: रजोनिवृत्तीतून जात असलेल्‍या स्त्रियांना याला सामोरे जावे लागते. तर पुरुषांच्‍याही स्‍नायूंच्‍या पेशीचे कार्य मंदावण्‍याची प्रक्रीया सुरु हाेते. त्‍यामुळे निरोगी राहण्‍यासाठी आहारातून काही पदार्थ टाळणे महत्त्‍वाचे ठरते. कारण आहाराच्‍या चुकीच्‍या सवयींमुळे तुमचे संपूर्ण आरोग्‍य बिघडू शकते. आता तुम्‍ही आहारात कोणते पदार्थ टाळावेत याची यादी मोठी आहे. मात्र याचे पालन केल्‍यास भविष्‍यात होणार्‍या आरोग्‍याच्‍या अनेक समस्‍यांपासून तुमची सुटका होईल. तसेच गंभीर आजारापासूनही तुमचा बचाव होण्‍यास मदत होईल. निरोगी आरोग्‍यासाठी खालील पदार्थ आहारातून हद्‍दपार करा.

चाळीशी पार केलीय कृत्रिम गोड पदार्थ नकाेच

मागील काही वर्षांमध्‍ये आपल्‍या आहारात गोड पदार्थांचा  समावेश अधिक आहे. आहारातील साखरेचे वाढत्‍या प्रमाणामुळे मागील काही वर्षात अनेक नवे विकार वाढले. त्‍यामुळेच  साखरेला आधुनिक काळातील विष मानले जावू लागले. त्‍यामुळे कृत्रिम गोड पदार्थाकडे वळू लागले. मात्र हे पदार्थही सामान्‍य साखरेसारखीच आरोग्‍यास हानीकारक असल्‍याचे, अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले आहे.

कृत्रिम साखरेमुळे मधुमेह व अन्‍य आरोग्‍य समस्‍या निर्माण होतात.  त्‍यामुळे साखर आणि कृत्रिम गोड पदार्थांना आपल्‍या आहारातून हद्‍दपार करा. तुम्‍हाला गोड पदार्थाच आवडत असतील तर नैसर्गिक पर्याय असणारा मध घ्‍या. त्‍यामध्‍ये अनेक पोषक घटक असतात.

साखर आणि मीठ

साखरेचा आरोग्‍यावर होणार दुष्‍परिणामांची सर्वांनाच माहिती आहे. साखर आणि मीठ या दोन्‍ही पदार्थांचा तुमच्‍या शरीरातील पेशींवर सारखाच परिणाम होता. तुम्‍हाला निरोगी राहायचे असेल तर साखर आणि मीठ याचा अतिरिक्‍त वापर टाळा. तसेच चवीपुरते मीठ हा शब्‍द प्रयाेगाचा वापर मुलांचाही आहारात करा.

सोडा आणि कोला

सोडा आणि कोला हे सर्वच वयोगटासाठी आरोग्‍यास अपाय करणारेच आहे. मात्र चाळीशीनंतर तुम्‍ही नियमित साेडा आणि काेलाचे सेवन करत असाल तर याचे दुष्‍परिणाम अधिक गंभीर दिसून येतात. गोठलेल्‍या पेयांमध्‍ये सारखेचे प्रमाण हे अतिरिक्‍त असेत. तर कोलामध्‍ये विषारी रसायने असतात. यामुळे पेयांपासून सर्वांनीच लांब राहावे आणि चाळीशी ओलांडल्‍यांनी याच्‍या नियमित सेवन केल्‍याचे त्‍याचे अआराेग्‍यावर गंभीर परिणाम हाेतात,  असे वैद्‍यकीय अध्‍ययनात स्‍पष्‍ट झाले आहे.

रंगं असणारे अन्‍नपदार्थ

मागील काही वर्षांमध्‍ये अन्‍नपदार्थांमध्‍ये चवीबरोबर ते आकर्षक दिसावेत म्‍हणू रंगांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. फूड कलरिंगमुळे शरीरावर मोठे दुष्‍परिणाम होतात. तुम्‍हाला अन्‍नपदार्थात रंग हवा असल्‍यास नैसर्गिक फळ आणि भाज्‍यांचे रंग वापरायासठी बीट ज्‍यूस व अन्‍य पालेभाज्‍यांचा वापर करु शकता. तसेच सारखयुक्‍त कॉकटेलपासूनही दूर राहिले पाहिजे.

बाटलीमधील तयार फळांचा रस

फळांचे बाटलीमधील तयार रस हा आरोग्‍यदायी नाही हे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे असा तयार रस पिण्‍यापेक्षा सरळ फळ खालेले अधिक चांगले ठरते.

फास्‍ट फूड

आता फास्‍ट फूडचा समावेश आपल्‍या आहारात झाला आहे. मात्र चाळीशीनंतर अतिरिक्‍त फास्‍ट फूड सेवनामुळे टाईप २ मधुमेह होण्‍याचा धोका वाढला आहे. याबाबत नुकतेच एका संशोधनात चाळीशी ओलांडलेल्‍या तीन हजार जणांना आठवड्यातून दोनदा फास्‍ड फूड खाण्‍यास दिले. त्‍यांना मधुमेह होण्‍याची शक्‍यता दुप्‍पट होते. त्‍यामुळे फास्‍ट फूडला टाळा .

खालील पदार्थांपासून दूर रहा…

अति भाजलेले, खारवलेले आणि वाळवलेले मांस
व्‍हीप्‍ड क्रीम असणारे पदार्थ
प्रक्रिया केलेले पॅकबंद पदार्थ
तळलेले विविध पदार्थ
कोल्ड्रिंक्स
डाएट सोडा
मिल्‍कशेक
साखरेचे प्रमाण अधिक असणारा ब्रेड
फ्रेंच फ्राईज
लाल मांस
साखर आणि फॅफिनयुक्‍त एनर्जी ड्रिंक्‍स

पाहा व्‍हिडीओ :

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT