ISRO Gaganyaan Mission 
Latest

ISRO Gaganyaan Mission: PM माेदींनी केली ‘अंतराळ’वारी करणार्‍या भारतीयांची घाेषणा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आज (दि.२७) मानवरहित गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांची नावे जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.२७) सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. दरम्यान, पीएम मोदींच्या हस्ते अंतराळवीरांना पंख प्रदान करून, गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना इस्रोने जगासमोर आणले. भारतीय भूमीवरून स्वदेशी अंतराळ वाहनातून अंतराळात जाणारे भारतीय हवाई दलाचे चार अधिकारी हे पहिले भारतीय असणार आहेत. (ISRO Gaganyaan Mission)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या प्रकल्प उद्घाटनादरम्यान गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी गगनयान मोहिमेतील अंतराळवीर म्हणून नियुक्त केलेल्या चार जणांना अंतराळवीर पंख प्रदान केले. यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला या चार अंतराळवीरांचा समावेश आहे. या चारही अंतराळवीरांनी रशियामध्ये व्यापक प्रशिक्षण घेतले आहे, असे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.  (ISRO Gaganyaan Mission)

ISRO Gaganyaan Mission:  मी त्यांचे अभिनंदन करताे- पीएम मोदी

या प्रसंगी बोलतानी पीएम मोदी म्हणाले, आज मला या अंतराळवीरांना भेटण्याची आणि त्यांना देशासमोर मांडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. संपूर्ण देशाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. तुम्ही आजच्या भारताचा गाैरव आहात." असेही पंतप्रधान माेदींनी नमूद केले.  (ISRO Gaganyaan Mission)

'या'; केवळ ४ व्यक्ती नव्‍हे तर चार 'शक्ती'

आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार आहोत. काही काळापूर्वी देशाला आपल्या चार गगनयान प्रवाशांची पहिल्यांदा ओळख झाली. ही फक्त 4 नावे आणि 4 मानव नाहीत तर 140 कोटी आकांक्षा अवकाशात घेऊन जाणारी ही 4 शक्ती आहेत. 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे; पण यावेळी वेळही आमची उलटी गिनतीही आमची आणि रॉकेटही आमचीच असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. आम्ही देशाला विकसित बनवण्याचा निश्चय केला आहे, येणाऱ्या काही वर्षातच आपण चंद्रावर जाऊ. आपले सॅटेलाईट देशाला सुरक्षित करण्याचे काम ,करत आहेत. टीम गगनयानला माझ्या शुभेच्छा आहेत., असेही माेदी म्‍हणाले.

ISRO Gaganyaan Mission

पाहा व्हिडिओ: पहिली मानवयुक्त #गगनयान मोहिम

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT