Latest

Israel Palestine Conflict : हमासने इस्रायलवर का हल्ला केला? ‘ही’ आहेत तीन कारणे

मोहन कारंडे

जेरूसलेम वृत्तसंस्था : इस्रायल पोलिस ९ मे २०२१ रोजी जेरूसलेमच्या अल अक्सा मशिदीत शिरले होते. तेथे ग्रेनेड हल्लाही केला होता. पॅलेस्टाईनमधील सशस्त्र इस्लामी कट्टरवादी संघटना हमासकडून इस्रायलला निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. इस्रायलच्या शहरांवर शेकडोंच्या संख्येने रॉकेट डागले गेले होते. इस्रायलने युद्धाची (Israel Palestine Conflict) घोषणा केली होती आणि अकरा दिवस पुढे युद्ध चालले होते. आता पुन्हा हमासने इस्रायलवर हल्ला चढविला आहे आणि इस्रायलने पुन्हा युद्धाची घोषणा केली आहे. (Israel Palestine Conflict)

संबंधित बातम्या : 

जेरूसलेमला ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू असे तिन्ही धर्माचे अनुयायी आपले पवित्र स्थळ मानतात. मुस्लिमांसाठी मक्का, मदिनानंतर अल अक्सा मशीद हे तिसरे पवित्र स्थळ आहे. अल अक्सा याच जागेवर इ. स. पूर्व १००० मध्ये सुलेमान (सॉलोमन) राजाने ज्यूसाठी मंदिर बनविले होते. टेंपल माऊंट म्हणून ते ओळखले जाते. या मंदिराची एक भिंत तेवढी आता उरलेली आहे. या भिंतीला वेस्ट वॉल म्हणतात. ज्यूंसाठी ही सर्वात पवित्र जागा आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथ न्यू टेस्टामेंटनुसार जेरूसलेमलाच प्रभू येशूने आपले उपदेश दिले होते आणि येथेच त्यांना वधस्तंभावर खिळविण्यात आले होते. येथेच ते पुनर्भवतरितही झाले होते. ज्यूंचे टेम्पल माऊंट (द वेस्ट बॉल) आणि मुस्लिमांची अल अक्सा मशीद एकाच परिसरात आहे. १९६७ च्या युद्धात इस्त्रायलने गाझा पट्टी व वेस्ट बँकवर तावा मिळविला आणि नंतर हा वाद चिघळला. नंतर जॉर्डन आणि इस्रायलमध्ये करार झाला. त्यानुसार अल-अक्सा मशिदीच्या अंतर्गत बाबींवर जॉर्डनमधील इस्लामिक ट्रस्ट वक्फचे नियंत्रण राहील आणि बाह्य सुरक्षा ही इस्त्रायलची जबाबदारी राहील, असे ठरले. (Israel Palestine Conflict)

अनेकदा सुरक्षेची सबब सांगून इस्रायली पोलिस मशिदीत शिरतात आणि त्यावरून युद्धसदृश वातावरण तयार होते. हमासला इराणचे पाठबळ आहे आणि इराण तसेच सौदी अरेबियात विळ्याभोपळ्याचे सख्य आहे.

हल्ल्याची तीन कारणे (Israel Palestine Conflict)

  • अल अक्सा मशिदीवर इस्रायलकडून झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा, इस्रायली पोलिस वारंवार मशिदीत शिरत असल्याचा सूड
  • पॅलेस्टिनी महिलांवरील इस्रायली पोलिसांचे हल्ले
  • गाझा, वेस्ट बँक भागांत इस्रायलचे अतिक्रमण

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT