Israel and Palestine War Update  
Latest

Israel Hamas war | हमास-इस्रायल संघर्षात शेकडो परदेशी नागरिक मारले, तर अनेकांचे अपहरण; जाणून घ्या कोणत्या देशाचे किती नागरिक?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमास दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर भयंकर बॉम्ब हल्ले केले. यानंतर प्रत्युत्तर देत इस्रायलने देखील जोरदार प्रतिहल्ले केले. या युद्धातील मृतांचा आकडा आतापर्यंत १६०० वर गेला आहे. हमासने इस्रालयवर केलेल्या हल्यात अनेक परदेशी नागरिक देखील मारले गेले आहेत. या संदर्भातील वृत्त 'एएफपी न्यूज एजन्सी'ने दिले आहे. (Israel Hamas war)

संबंधित बातम्या:

AFP च्या वृत्तानुसार, गाझा-इस्त्रायल सीमेजवळील आयोजित संगीत महोत्‍सवात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. हमास दहशतवाद्यांनी या ठिकाणीही अंदाधूंद गोळीबार करत, रक्तपात घडवला. यामध्ये २६० हून अधिक मृतदेह सापडले असून, अनेकांचे अपहरण करण्यात आले आहे. यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचा देखील समावेश असल्याचे 'एएफपी' संस्थेने म्हटले आहे. (Israel Hamas war)

Israel Hamas war : थायलंड: 12 मृत, 11 ओलिस

हमास आणि इस्रायलच्या संघर्षात बारा थाई नागरिक ठार झाले, तर आठ जखमी झाले आहेत. तर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या कांचना पत्राचोके यांनी सोमवारी दिली. तसेच कामगार मंत्री फिफाट रत्चकितप्रकर्ण यांनी सांगितले की, संघर्षाचा फटका बसलेल्या भागात सुमारे ५ हजार थाई कामगार काम करत होते त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

अमेरिका : 11 मृत, इतर बेपत्ता

अमेरिकेने सोमवारी किमान 11 अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली. तसेच हमासने ओलिस ठेवलेल्यांमध्ये अमेरिकन लोकांचा देखील समावेश असण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे.

 नेपाळ : 10 मृत

हमास हल्ल्याच्या फ्लॅशपॉईंटपैकी एक असलेल्या किबुट्झ अल्युमिममध्ये नेपाळच्या दहा नागरिकांचा मृत्यू झाला,असे तेल अवीवमधील हिमालय प्रजासत्ताकच्या दूतावासाने रविवारी सांगितले. दरम्यान, हल्ल्याच्यावेळी किबुट्झ अल्युमिम येथे17 विद्यार्थ्यी राहत असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

अर्जेंटिना : 7 मृत, 15 बेपत्ता

अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी पुष्टी केली की, देशातील सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि इतर 15 बेपत्ता आहेत.

युक्रेन : 2 मृत

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ओलेग निकोलेन्को यांनी रविवारी सांगितले की, इस्रायलमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या दोन युक्रेनियन महिलांची हत्या करण्यात आली.

फ्रान्स: 2 मृत, 14 बेपत्ता

इस्रायलवर हमासच्या दहशतवादी हल्ल्यात दोन फ्रेंच लोक ठार झाले आहेत, फ्रेंच सरकारने सांगितले आहे. हमासने इस्रायलमध्ये प्राणघातक हल्ले सुरू केल्यानंतर बेपत्ता झालेल्या 14 नागरिकांपैकी एक 12 वर्षांचा मुलगा आहे, फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाने ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. यापैकी काही जणांचे अपहरण झाल्याची शक्यता अधिक आहे. तसेच ही संख्या अजूनही बदलण्याची शक्यता आहे. असे देखील फ्रेंच सरकारने म्हटले आहे.

रशिया: 1 मृत, 4 बेपत्ता

तेल अवीवमधील रशियन दूतावासाने सोमवारी जाहीर केले की, रशियन वृत्तसंस्थांच्या हवाल्याने किमान एक रशियन ठार झाला आहे आणि इतर चार बेपत्ता आहेत.

यूके: 1 मृत, 1 बेपत्ता

इस्रायलचे ब्रिटनमधील राजदूत म्हणाले की, एक 26 वर्षीय ब्रिटिश नागरिक बेपत्ता आहे. त्या व्यक्तीचे नाव स्पष्ट करण्यात आले नाही. इस्रायली सैन्यात कार्यरत असलेले ब्रिटीश नागरिक नॅथनेल यंग (वय-20) हा देखील हमासशी लढताना मरण पावला, असे त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी सांगितले.

कॅनडा: 1 मृत, 3 बेपत्ता

कॅनडाच्या सरकारने सोमवारी सांगितले की, एक कॅनेडियन मरण पावला आणि इतर तीन बेपत्ता आहेत.

कंबोडिया: 1 मृत

कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी सांगितले की, एका कंबोडियन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

जर्मनी: अनेकजण ओलिस

अनेक दुहेरी जर्मन-इस्रायली नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते, असे जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्राने रविवारी सांगितले.

 ब्राझील: 3 बेपत्ता

ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, येथील संगीत उत्सवात सहभागी झाल्यानंतर तीन ब्राझिलियन-इस्रायली नागरिक बेपत्ता होते.

इटली: 2 बेपत्ता

इटालियन परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी सांगितले की, दोन इस्रायली-इटालियन बेपत्ता आहेत. ते अद्याप सापडलेले नाहीत तसेच कॉलला उत्तरही देत नाहीत, असे इटालियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

 पॅराग्वे: 2 बेपत्ता

इस्रायलमध्ये राहणारे दोन पराग्वे नागरिक बेपत्ता आहेत, पॅराग्वेच्या सरकारने तपशील न देता सांगितले आहे.

पेरू: 2 बेपत्ता

पेरूच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणखी तपशील न देता दोन नागरिक बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.

 टांझानिया: 2 बेपत्ता

इस्रायलमधील टांझानियाच्या राजदूताने एएफपीला सांगितले की, दोन टांझानियन नागरिक बेपत्ता आहेत.

मेक्सिको: 2 ओलिस

मेक्सिकोच्या परराष्ट्र मंत्री अ‍ॅलिसिया बार्सेना यांनी एक्सवरून (पूर्वी ट्विटर) दिलेल्या माहितीत लिहिले की, दोन मेक्सिकन, एक पुरुष आणि एक महिला यांना ओलीस ठेवण्यात आले होते. यासंदर्भातील अधिक तपशील न देता मेक्सिकोने स्पष्ट केले आहे.

कोलंबिया: 2 ओलिस

सुपरनोव्हा महोत्सवात सहभागी झालेले दोन कोलंबियन बेपत्ता आहेत, कोलंबियातील इस्रायलच्या राजदूताने एक्सवरून दिलेल्या माहितीत सांगितले आहे. कोलंबिया सरकारने पुष्टी केली की दोन कोलंबियन लोक रेव्हमध्ये होते आणि त्यांना शोधण्यात शोधमोहिम राबवली जात असल्याचे म्हटले आहे.

 पनामा: 1 बेपत्ता

पनामा सरकारने सांगितले की, त्यांचा एक नागरिक, डेरेलिस डेनिस सेझ बतिस्ता बेपत्ता आहे.

आयर्लंड: 1 बेपत्ता

आयरिश-इस्त्रायली महिला बेपत्ता झाल्याची आयरिश सरकारने पुष्टी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT