वाशिंगटन : उत्तर सोमालियामध्ये अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा (ISIS) दहशतवादी बिलाल अल-सुदानी याच्यासह त्याचे 10 साथीदार ठार झाले आहेत. अमेरिकेकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दोन वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी याची माहिती दिली. या लष्करी कारवाईला राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हिरवा सिग्नल दिला, असे अधिका-यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर सोमालियातील डोंगरातील एका गुफेत म्होरक्या बिलाल अल-सुदानी संपूर्ण आफ्रिकासह महाव्दीपमध्ये ISIS च्या विस्ताराची आणि अन्य कारवायांची योजना आखत होता. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानुसार, 25 जानेवारीला, अमेरिकन सैन्याने उत्तर सोमालियामध्ये एक मोहीम राबवून हल्ला चढवला. यामध्ये बिलाल अल-सुदानीसह अनेक इस्लामिक स्टेट सदस्य ठार झाले. अल-सुदानी आफ्रिकेत ISIS च्या वाढत्या उपस्थितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अफगाणिस्तानसह जगभरातील इसिसच्या ऑपरेशन्ससाठी निधी पुरवण्यासाठी जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकन रक्षामंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सांगितले की, या लष्करी कारवाईदरम्यान कोणत्याही नागरिकाला इजा झाली नाही. या यशस्वी दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये मदत केल्याबद्दल आम्ही आमच्या असामान्य सेवा सदस्यांचे तसेच आमच्या गुप्तचर सदस्यांचे आणि इतर आंतर-एजन्सी भागीदारांचे आभारी आहोत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, तसेच युएस सैन्याने हा हल्ला अल-सुदानीला पकडण्यासाठी केला होता, परंतु त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्याचा मृत्यू झाला.