Latest

इशान किशन की केएस भरत कोणाची लागणार WTC Final च्या प्लेइिंग इलेव्हनमध्ये वर्णी?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात इशान किशन किंवा केएस भरत यापैकी कोणाला संधी द्यावी मिळावी? याबाबत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांनी आपली मते वक्त केली आहेत. ७ जूनपासून होणाऱ्या फायनलसाठी कोणाला जागा मिळावी हे यावेळी त्यांनी सांगितले. (WTC Final)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या यष्टिरक्षक फलंदाजाला संधी मिळावी? याबाबत टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी खेळाडू दिनेश कार्तिक यांनी आपलं मत मांडलं आहे. WTC फायनल लंडनमधील ओव्हल येथे ७ जूनपासून खेळवली जाणार आहे. अशा स्थितीत ईशान किशनला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं आहे. (WTC Final)

रवी शास्त्री म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी केएस भरत हा संघ व्यवस्थापनाची निवड असेल. अपघातानंतर यष्टिरक्षक ऋषभ पंत बरा होत आहे, तर त्याच्या जागी आलेल्या लोकेश राहुलच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया झाली आहे. ओव्हल येथे ७ जूनपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलसाठी भरत आणि इशान किशन यांच्यात कोणाची निवड करायची याबाबत सी बीच टीम इंडियाचे व्यवस्थापन संभ्रमात आहे.

भरताला संधी मिळणार ?

शास्त्री म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीला बॉर्डर-गावसकर मालिकेदरम्यान भरतने विकेटकीपिंग केले, त्यामुळे मला आशा आहे की इशानपेक्षा भरतला प्राधान्य मिळेल. भरतने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व कसोटी सामने खेळले, त्यामुळे अंतिम ११ मध्ये निवड होण्यासाठी तो पहिली पसंती असेल असे मला वाटते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भरतची कामगिरी अपेक्षित नव्हती. भरतने यष्टिरक्षक म्हणून कामगिरी बजावली पण त्याला अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करता आली नाही. फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याला केवळ १०१ धावा करता आल्या. भरतने केवळ चार कसोटी सामने खेळले असले, तरी त्याने ९० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.

इशानने अद्याप कसोटीत पदार्पण केलेले नाही. त्याने केवळ ४८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये केएल राहुलला दुखापत झाल्यानंतर त्याचा WTC च्या भारतीय संघात समावेश करण्यात आला. इशानने गतवर्षी चितगावमध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय द्विशतक झळकावले होते.

दिनेश कार्तिकला आवडतो 'हा' यष्टीरक्षक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला वाटते की भरतच्या अनुभवामुळे त्याला WTC फायनलसाठी पहिली पसंती मिळाली पाहिजे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT