Latest

Iranian Model In Cannes 2023 : कान्समध्ये फाशीचा ड्रेस परिधान करुन ईराणी अभिनेत्रीने वेधले लक्ष

अमृता चौगुले

कान्स (फ्रान्स); पुढारी ऑनलाईन : दरवर्षी प्रमाणे कान्स फिल्म फेस्टिव्हल यंदाही अनोखे आणि विशेष राहिले आहे. या महोत्सवात नेहमी प्रमाणे भारतीय कलाकारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला आणि त्यांची विशेष चर्चा सुद्धा रंगली. इतर वर्षाप्रमाणे या वर्षीमात्र कान्स काही विशेष गोष्टीमुळे सुद्धा प्रसिद्धी झोतात आले. यंदाचे कान्स निषेध नोंदविण्याचे आणि राजकीय विधाने करण्याचे आंततराष्ट्रीय मंच सुद्धा ठरला. युक्रेनियन ध्वजाच्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या एका महिलेने उत्सवाच्या प्रतिष्ठित पायऱ्यांवर केलेल्या निषेधाने याची सुरुवात झाली. यानंतर आता इराणी वंशाची मॉडेल महलाघा जबेरी हिने एका अनोख्या प्रकारे आपला निषेध नोंदवला आहे. ती काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन कान्समध्ये दाखल झाली. काळ्या ड्रेसह तिच्या गळ्यात फाशीचा फास सुद्धा होता. हा ड्रेस घालून इराणमधील फाशीच्या शिक्षेच्याविरोधातील संदेश तिने या वेळी दिल्याचे बोलले जात आहे. (Iranian Model In Cannes 2023)

ईराणी अभिनेत्री महलाघा जबेरी हिने इराणमध्ये होणाऱ्या अत्याचारा विरोधात विधान केले, ते निश्चितच एका चांगल्या कारणासाठी होते. जबेरीने तिचा पोशाख परिधान केलेला एक मॉन्टेज व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, "फाशी थांबवा." यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली. (Iranian Model In Cannes 2023)

व्हिडिओ शेअर करताना जबेरीने सोशल मीडियावर लिहिले की, 'इराणच्या लोकांना समर्पित, ७६ वा कान चित्रपट महोत्सव. माझा ड्रेस @jilaatelier ने डिझाइन केला आहे. अविश्वसनीय व्हिडिओग्राफर @joystrotz द्वारे. आमच्या विचारांच्या दृष्टीला जिवंत केल्याबद्दल धन्यवाद आणि हे सर्व शक्य केल्याबद्दल माझे व्यवस्थापक Myhanh @mahlaghamagement चे विशेष आभार. #StopExecutionsInIran. (Iranian Model In Cannes 2023)

सोशल मीडियावर प्रतिक्रीया देत एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, 'मी तुम्हाला फॉलो केले नाही आणि मी तुम्हाला इतके ओळखतही नाही, पण आज देशाचे शत्रू वगळता सर्वजण तुमच्या देशभक्तीबद्दल बोलत आहेत, तुम्ही ते उत्तम प्रकारे दाखवले. दुसर्‍या युजरने कमेंट केली, "तुम्ही जगाला दिलेला संदेश छान होता. धन्यवाद, प्रिय महलाघा. स्वातंत्र्याची आशा."

या वर्षी इराणमध्ये फाशीचा शिक्षेचा पूर आला असून तो मानवी हक्कांसाठी धोक्याचा आहे. महलाघा जबेरी हिने इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी ही अनोखी कृती केली आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT