IPL FINAL 2023 : अंतिम सामन्यात पुन्हा पावसाचा अडथळा

IPL FINAL 2023 : अंतिम सामन्यात पुन्हा पावसाचा अडथळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा महाअंतिम सामना आज (दि. २९ ) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या सोळाव्या सत्राचा चॅम्पियन बनण्यासाठी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज हे आमने-सामने आहेत. टॉस जिंकत चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या आणि वृद्धीमान सहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१४ धावा केल्या असून चेन्नईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे ३ चेंडूमध्ये ४ धावा चेन्नईने काढल्या आणि सामना पावसामुळे थांबला आहे.

 आयपीएलचा किताब पाचव्यांदा आपल्या नावावर करण्यासाठी चेन्नईला २१५ धावा कराव्या लागणार आहेत. साई सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. सुरुवातीला शुभमन गिल आणि वृद्धीमान सहाने तर शेवटच्या षटकांमध्ये साई सुदर्शन आणि हार्दिक पंड्याने चेन्नईच्या फलंदाजांची चागंलीच धुलाई केली. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने २० चेंडूमध्ये ७ चौकारांच्या सहाय्याने ३९ धावा, वृद्धीमान सहा ३९ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५४ धावा, साई सुदर्शनने ६ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूमध्ये ९६ धावा आणि हार्दिक पंड्याने १२ चेंडूमध्ये २१ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

चेन्नईचा संघ – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक चहर, मथीशा पथीराणा, तुषार देशपांडे, महिश तीक्ष्णा

गुजरातचा संघ – वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news