पुढारी ऑनलाइन डेस्क : Iran Hijab Bill : इराणमध्ये महिलांच्या हिजाब घालण्यावरील कायदा आणखी कडक करण्यात आला आहे. ईराणच्या संसदेने नुकतेच एक विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये महिलांनी हिजाब न घातल्यास तसेच टाइट कपडे घातल्यास त्यांना 10 वर्षांचा कारावास भोगावा लागेल. तसेच या कायद्यात पुरुषांसाठी देखील नियम बनवण्यात आले आहेत. हिजाब न घालणाऱ्या महिलेचे कोणत्याही प्रकारे समर्थन करणाऱ्या पुरुषालाही दंड केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
ईराणच्या संसदेत याविषयी विधेयक पारित करण्यात आले आहे. या विधेयकात सार्वजनिक स्थानांवर हिजाब घालण्यास नकार देणाऱ्या महिला आणि त्यांना साथ देणारे पुरुष दोघांवरही कारवाई करण्यात येणार आहे. ईराणच्या संसदेत 290 सदस्य आहेत. त्यापैकी 152 सांसद या विधेयकाच्या बाजूने होते.
सध्याच्या कायद्याच्या तुलनेत प्रस्तावित कायद्यातील शिक्षेची मुदत 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 लाख ते 6 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हिजाबची खिल्ली उडवणाऱ्या कोणत्याही मीडिया किंवा एनजीओला दंड आणि तुरुंगवास भोगावा लागेल.
हे ही वाचा :