Latest

IPL fixing-betting scandal : अजित चंडीला याला बीसीसीआयचा दिलासा; स्पॉटफिक्सिंगप्रकरणी आता ७ वर्षांची बंदी

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अजित चंडीला, एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण या तीन भारतीय क्रिकेटपटूंवर 2013 मध्ये आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट जगतात वादळ निर्माण झाले होते. यामुळे तीन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. आता याप्रकरणी बीसीसीआयने चंडीला याला दिलासा देताना त्याच्यावरील आजीवन ऐवजी सात वर्षांची बंदी अशी शिक्षा कमी केली आहे. (IPL fixing-betting scandal)

चंडीला, श्रीशांत आणि चव्हाण हे तिघेही खेळाडू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात होते. या प्रकरणानंतर या तिघांची क्रिकेट कारकीर्द रुळावरून घसरली. त्यानंतर एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. श्रीशांत देशांतर्गत क्रिकेटही खेळला, तर चंडिला अजूनही क्रिकेटच्या मैदानापासून दूरच आहे. (IPL fixing-betting scandal)

2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीचा सामना करणार्‍या चंडीलाला दिलासा देताना बीसीसीआयने पुनरागमनाचे दरवाजे उघडले. (IPL fixing-betting scandal)

आजीवन बंदी उठवली (IPL fixing-betting scandal)

बीसीसीआयचे लोकपाल विनित सरन यांनी सांगितले की, चंडीला याच्यावरील आजीवन बंदी हटवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. ही बंदी आता सात वर्षांची असेल. जी 2016 पासून लागू आहे, असे समजले जाईल. बीसीसीआयने त्याला 17 मे 2023 पर्यंत क्रिकेटच्या सर्व गतीविधींपासून निलंबित केले. बीसीसीआयच्या अनुशासनात्मक कारवाईचाही यात समावेश आहे. चंडीलाने 2019 मध्ये श्रीशांत, अंकितप्रमाणे आपल्यावरील आजीवन बंदी मागे घेण्याचा अर्ज केला होता. जो आता मंजूर झाला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT