Latest

IPL 2024 : लोकसभा निवडणुकीमुळे IPL चा पुढचा हंगाम रंगणार विदेशात?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024)चा पुढच्या हंगामाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आयपीएलच्या पुढील म्हणजे 2024 च्या हंगामाची तयारी करत आहे. तसेच पुढील आयपीएल परदेशात होण्याची शक्यता आहे. देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका हे या मागे कारण असल्याचे समजते आहे. बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 साठी विंडो शोधून ही स्पर्धा लवकर होऊ शकते. आम्हाला माहीत आहे की निवडणुका होणार आहेत आणि या सर्व गोष्टी आमच्या योजनेत समाविष्ट आहेत.

आयपीएल लवकर सुरू होऊ शकते

बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने सांगितले की, 'आयपीएल 2024 ची (IPL 2024) स्पर्धा लवकर सुरू होऊ शकते. आम्हाला माहीत आहे की देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत, आणि या सर्व गोष्टी आमच्या योजनेत समाविष्ट आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुढील वर्षी मार्चच्या सुरुवातीला आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. तसेच, मे महिन्याच्या मध्यात त्याची सांगता होऊ शकते. तथापि, सध्या आमचे संपूर्ण लक्ष यावर्षी भारतात होणार्‍या वनडे विश्वचषक 2023 वर आहे. आयपीएलला अजून बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे गोष्टी कशा पुढे जातात ते येणा-या काळात समजेल.'

विदेशात आयोजन होण्याची दाट शक्यता

आयपीएलचा 17 वा हंगाम (IPL 2024) विदेशात आयोजित करण्याबाबत बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, याआधीही आम्ही निवडणुकांच्या कार्यकाळात स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. त्यामुळे आमची पहिली प्राथमिकता आयपीएलची स्पर्धा फक्त भारतातच आयोजित करण्याला असेल. पण गरज भासल्यास स्पर्धेचे आयोजन विदेशात केले जाऊ शकते. तत्कालीन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. अजून बराच वेळ असला तरी आता त्याबाबत काहीच सांगता येणार नाही.

यापूर्वीही 'असे' घडले आहे

लोकसभा निवडणुकीमुळे आतापर्यंत दोनदा भारताबाहेर आयपीएलचे (IPL) आयोजन करण्यात आले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीमुळे द. आफ्रिकेत ही स्पर्धा रंगली होती. त्यानंतर 2014 मध्ये असे घडले. मात्र, तेव्हा लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचे दोन भागात आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील निम्मे सामने भारतात तर उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले.

सीएसके आयपीएल 2023 चा विजेता

आयपीएलच्या 16 (IPL 2023) हंगामाचे विजेतेपद महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा ट्रॉफी उंचावली. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई हे दोन्ही संघ 5-5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारे संघ बनले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT