नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली कॅपिटल्सने आरसीबी संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. आयपीएल 2023 मध्ये जवळपास अर्धा हंगाम संपला आहे आणि सर्व संघ प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत दिल्लीचा संघ पहिल्यापासून तळामध्ये अडकला होता, पण शनिवारी दिल्लीच्या आरसीबीविरुद्धच्या विजयाने गुणतालिकेत नवी समीकरणे निर्माण झाली आहेत. (IPL 2023)
आयपीएल 2023 मध्ये आरसीबी संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 5 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. त्याच्याकडे 10 गुण आहेत आणि रेट रनरेट 0.209 आहे. गुणतालिकेत तो पाचव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागतील. त्यामुळे 16 गुण मिळतील. याशिवाय त्याला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागू शकते. दिल्ली कॅपिटल्स संघ शेवटच्या स्थानावर होता; परंतु या विजयासह दिल्लीचे 2 गुण झाले आणि तो नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2023)
हेही वाचा;