Latest

IPL 2022 : रियान पराग याच्या ‘त्या’ कृतीनं क्रिकेट फॅन्स चिडले, सोशल मीडियावर ट्रोल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

IPL 2022 : आयपीएलच्या ६३ व्या सामन्यात राजस्थानने रविवारी लखनौवर (Lucknow Super Giants vs Rajasthan Royals) रॉयल विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने भक्‍कम पाऊल टाकले. आता तेरा सामन्यांतून त्यांच्या खात्यात १६ गुण झाले असून गुणतालिकेत त्यांनी लखनौला मागे टाकून दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील चमूने हा सामना २४ धावांनी जिंकला. लखनौचेही १६ गुण आहेत. तथापि, सरस धावगतीच्या (नेट रनरेट) आधारे राजस्थानने लखनौला मागे टाकले आहे.

या सामन्यादरम्यान राजस्थानचा फिल्डर रियान पराग याने मैदानात असे काही वर्तन केले की ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे. लखनौ खेळत असताना रियान परागने प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर लाँग ऑनवर मार्कस स्टोयनिसचा झेल पकडला. त्याचा झेल पकडताच राजस्थानने दोन गुण निश्चित केले. पण झेल पकडल्यानंतर परागने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले त्यामुळे तो वादात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीजवळ नेला. हे पाहून प्रेक्षकांना असे वाटू लागले की तो चेंडू जमिनीला टच करेल. पण त्याने चेंडू जमिनीला टच न करता वरती घेतला. त्याची ही कृती क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

"या रियान परागने नौटंकी करून टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रत्येकाला मूर्ख बनवले. त्याला या स्पर्धेतून बाहेर काढले पाहिजे." असे काही युजर्संनी ट्विट करत रियानच्या कृतीवर त्याला ट्रोल केले आहे. एका युजरने मीम्स बनवत त्याला निशाणा बनवले आहे. रियानच्या कृतीने कमेंटेटरदेखील नाराजी व्यक्त केली. (IPL 2022)

दरम्यान, रविचंद्रन अश्‍विनने कृणाल पांड्याला बाद केले होते. सीमारेषेवर त्याचा झेल ट्रेंट बोल्ट आणि रियान पराग यांनी संयुक्‍तरीत्या टिपला. पंड्याने २५ धावा केल्या. (LSG vs RR)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT