Latest

Girl proposes Boyfriend : IPL च्या ‘मांडवा’त, ‘ती’ म्हणाली माझा होशील का? (Video)

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेट जगतातील एक मोठी स्पर्धा आहे. पण ती केवळ एक स्पर्धा नसून, तर चाहत्यांसाठी हा एक मोठा सण असतो, जो ते सामन्यादरम्यान आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतात. असाच एक भावनिक क्षण बंगळूर आणि चेन्नईदरम्यानच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान चक्क एका तरुणीने तिच्या मित्राला प्रपोज करून स्टेडियममध्ये बसलेल्या सर्व चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. या आनंदी घटनेनंतर एमसीए स्टेडियमवर चाहत्यांनी एकच जल्लोष केला. (Girl proposes to RCB fan)

IPL 2022 मध्ये बुधवारी 49 वा सामना खेळला गेला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने चेन्नई सुपर किंग्जवर 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हंगामातील हा सातवा पराभव होता, तर बंगळूर सहाव्या विजयासह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. चौकार-षटकारांशिवाय सामन्यात अनेक रोमांचक क्षण यावेळी पाहायला मिळाले. (Girl proposes to RCB fan)

सामन्यादरम्यान, तरुणीने तिच्या मित्राला आरसीबीच्या चाहत्यांसमोर प्रपोज करताच, त्याने हो म्हटले आणि तिला मिठी मारली. ज्या आरसीबी संघाच्या पाठिंब्यासाठी तो आला होता त्या संघाने विजय मिळवल्याने तरुणाचा आनंद द्विगुणित झाला. (Girl proposes to RCB fan)

चेन्नई सुपर किंग्जच्या इनिंगचे 11वे षटक सुरू होते. त्याचवेळी कॅमरामनने एक घटना कॅमे-यात कैद केली. स्क्रिनवर एक प्रेमीयुगुल झळकले. यावेळी एक तरुणी तिच्या मित्राला गुडघ्यावर बसून प्रपोज करत होती. हा क्षण पाहताच प्रेक्षकांच्या नजरा त्या जोडप्यावर खिळले. तरुणीने प्रपोज केल्यानंतर त्या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता लगेच हो म्हणत तरुणीला मिठी मारली. तरुणाने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची जर्सी, तर तरुणीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. दोघांच्या प्रेमाचा आनंदोत्सव पाहिल्यानंतर मैदानावर प्रचंड जल्लोष झाला आणि टाळ्यांचा कडकडाट त्या जोडप्याचे अभिनंदन करण्यात आले. (Girl proposes to RCB fan)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण अशा पद्धतीने खेळाच्या मैदानात प्रपोज करणे ही पहिलीच वेळ नाही. मात्र, लाइव्ह मॅचदरम्यान एखाद्या मुलीने आपल्या आवडत्या मुलाला प्रपोज करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याची चर्चा रंगली आहे.

आपल्या मजेशीर शैलीसाठी ओळखला जाणारा माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरनेही या जोडीचा फोटो शेअर केला आहे. त्याने आरसीबीच्या चाहत्याला प्रपोज करणा-या स्मार्ट तरुणीचे कौतुक केले आहे. छान केले, प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस निवडलास असे त्याने म्हटले आहे. पण त्याने तरुणाला एक खास सल्ला दिला आहे. जाफर म्हणतो, तो तरुण आरसीबीशी एकनिष्ठ राहू शकला तर तो नक्कीच त्याच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहू शकतो, असे व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT