Virat Vs Sa Series : द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली होणार ‘आऊट’? | पुढारी

Virat Vs Sa Series : द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली होणार ‘आऊट’?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Vs Sa Series : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) विराट खराब फॉर्मशी झुंजत असून त्याच्या बॅटमधून मोठी खेळी कधी साकारेल याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आयपीएलनंतर सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने विराट कोहलीच्या सध्याच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली असून बीसीसीआय आणि निवड समितीसाठी हा आता महत्त्वाचा विषय बनला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराटला विश्रांती दिली जाऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत. (Virat Kohli Vs Sa Series)

एका वेब पोर्टलला बीसीसीआय निवड समितीच्या एका सदस्याने महत्त्वाची माहिती सांगितली. या माहितीनुसार, विराट कोहली सारखा एखादा मोठा खेळाडू बॅड पॅचच्या टप्प्यातून जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. असो, साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न आहे, जेणेकरून ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देता येईल. विराटला विश्रांती दिली जाईल, पण त्याला खेळायचे असेल तर विचार करू. बैठकीपूर्वी निवडकर्ते त्याच्याशी चर्चा करतील, असे त्यांनी सांगितले. (Virat Kohli Vs Sa Series)

IPL 2022 मध्ये विराट कोहलीची वाईट अवस्था…

विराट कोहली आयपीएल 2022 मध्ये धावांसाठी आसुसलेला आहे. विराट कोहलीने या मोसमात 9 सामन्यात 128 धावा केल्या आहेत, त्यापैकी पाच वेळा तो दुहेरी आकडा पार करू शकलेला नाही. या मोसमात विराटची धावसंख्या 41*, 12, 5, 48, 1, 12, 0, 0, 9 अशी आहे. भारतीय संघ 9 जूनपासून साऊथ आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. (Virat Kohli Vs Sa Series)

पाच सामन्यांच्या T20 मालिकेचे वेळापत्रक:

• 9 जून 1ला T20 सामना : दिल्ली
• 12 जून 2रा T20 सामना : कटक
• 14 जून 3रा T20 सामना : विशाखापट्टणम
• 17 जून 4 था T20 सामना : राजकोट
• 19 जून पाचवा T20 सामना : बंगळूर

Back to top button