Latest

IPL 2022 : ‘या’ तारखेपासून सुरु हाेणार ‘आयपीएल’ सीजन?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  IPL 2022 साठी महालिलाव नुकताच पार पडला.  आता पुढील महिन्यात  'आयपीएल' सीजनला सुरूवात होणार असून, बीसीसीआय पुढील आठड्यात यासंदर्भात अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. यंदाच्या सीजनमध्‍ये १० संघ सहभागी होणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा १५ वा हंगाम सुरू हाेणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना मे महिन्याच्या अखेरीस खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील आठवड्यात IPL 2022 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करेल. कोरोना विषाणूची लाट टाळण्यासाठी त्याचे सर्व सामने महाराष्ट्रात आयोजित केले जातील, अशीही माहिती समाेर येत आहे.

'या' तारखेपासून सुरू होऊ शकतो आयपीएल १५ वा हंगाम

इनसाइडस्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलचा १५ वा हंगाम २७ मार्चपासून सुरू होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे. यंदाच्या या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. कारण १४ व्या हंगामा दरम्यान मंडळाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पहिला टप्पा भारतात पार पडला. त्याचवेळी कोरोना महामारीच्या धोक्यामुळे यूएईमध्ये दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करावे लागले हाेते.

अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता

आयपीएल 2022 च्या संभाव्य यादीमध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या रिलायन्स जिओ स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे घरचे मैदान असणार आहे. BCCI ने IPL 2022 साठी पुढील सामन्यांसाठी सहा ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुंबई, पुणे आणि अहमदाबादच्या नावांचा समावेश आहे. तथापि, जिओ स्टेडियमला ​​अद्याप ब्रॉडकास्ट टीमकडून मंजुरी मिळालेली नाही. या IPL हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT