IPL 2021: हैदराबादचा स्टार गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटीव्ह  
Latest

IPL 2021: हैदराबादचा स्टार गोलंदाज नटराजन कोरोना पॉझिटीव्ह

रणजित गायकवाड

दुबई; पुढारी ऑनलाईन : IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग फेज-2 मध्ये आज (दि. २२) बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना रंगणार आहे. पण त्यापूर्वीच एक मोठा धक्का बसला आहे. आता हा सामना होईल की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

सनराइजर्स हैदराबादचा स्टार गोलंदाज टी नटराजनला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याचा कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

संघातील इतर खेळाडूंपासून नटराजनला वेगळे करण्यात आले आहे. त्याला अलगिकरणामध्ये ठेवण्यात आल्याचे हैदराबाद संघ व्यवस्थापणाने सांगितले आहे. दरम्यान, टी नटराजनच्या संपर्कात आलेल्या सहा क्रिकेटपटूंचा शोध लागला आहे. तूर्तास सर्वांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, बीसीसीआयने आजचा सामाना निर्धारित वेळापत्रकानुसार खेळवला जाणार असल्याची माहिती दिली आहे.

मे महिन्यात अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएलचा हंगाम पुढे ढकलावा लागला. यानंतर, बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये उर्वरीत आयपीएलचे सामने खेळवले जातील असा निर्णय घेतला.

कोरोनामुळे टी२० विश्वचषक भारतात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएल फेज 2 नंतर ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या फेजमध्ये अमित मिश्रा, रिद्धीमान शहा, वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, नितीश राणा, देवदत्त पडिक्कल, डॅनियल सॅम आणि अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी, चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन, मुंबईचे किरण मोरे, डीडीसीएचे ग्राउंडमन, वानखेडेचे ग्राउंड स्टाफ आणि आयपीएलची ब्रॉडकास्ट टीम कोरोना पॉझिटीव्ह आली होती.

IPL 2021 च्या फेज-1 च्या समाप्तीवेळी दिल्लीचा संघ ८ सामन्यांत १२ गुणांसग पॉइंट टेबलमध्ये पहिल्यास्थानी होती. तर हैदराबादचा संघ ७ सामने खेळून केवळ २ गुण मिळवून शेवटच्या स्थानवर होता.

फेज-2 च्या पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला आणि दिल्लीकडून पहिले स्थान हिसकावले. आज हैदरबाद विरुद्धच्या सामन्यात दिल्लीने जर विजय मिळवला तर ते पुन्हा पहिल्या स्थानी जातील.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला डेव्हिड वॉर्नरकडून मोठ्या आशा आहेत. सनरायझर्स हैदराबादने सामन्याच्या काही तास आधी वॉर्नरने सराव करताना शॉट घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याचे कॅप्शन दिले आहे की 'आम्ही तयार आहोत'.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT