Latest

Los Angeles 2028 Olympics | तब्बल १२८ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाणार, T20 सामने होणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) अधिवेशनात स्वीकारण्यात आला. यामुळे बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (षटकार) आणि स्क्वॉश या चार इतर खेळांसह क्रिकेटही २०२८ मधील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा भाग असेल. (Los Angeles 2028 Olympics)

संबंधित बातम्या 

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट स्पर्धा T20 फॉरमटमध्ये असेल. पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेचा त्यात समावेश असणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) कार्यकारी मंडळाने गेल्या आठवड्यात लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. पुरुष आणि महिला संघांमध्ये टी20 स्वरूपात क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे.

अशा प्रकारे १२८ वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार आहे. १९०० च्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पॅरिसमध्ये दोन दिवसांच्या कालावधीत क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा खेळवण्यात आली होती.

"आयओसी (IOC) सदस्य, एक भारतीय आणि एक क्रिकेट फॅन म्हणून, आयओसी सदस्यांनी एलए समर ऑलिंपिक २०२८ मध्ये क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी मतदान केले याचा मला आनंद आहे! क्रिकेट हा जागतिक स्तरावरील सर्वात प्रिय खेळांपैकी एक आहे. १.४ अब्ज भारतीयांसाठी क्रिकेट हा केवळ एक खेळ नाही, तो एक धर्म आहे!" अशी प्रतिक्रिया आयओसीच्या सदस्या नीता अंबानी यांनी हा प्रस्ताव मुंबईतील ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनात स्वीकारल्यानंतर व्यक्त केली.

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT