पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमध्ये तुफान पाऊस पडला असून महिन्याभराचा पाऊस एका तासातच कोसळला. यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे लंडनमधील लोकांची तारांबळ उडाली.
सोमवारी रात्री लंडनमध्ये तुफान पाऊस पडणार असल्याचे इशारा देण्यात आला होता. या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. यामुळे नदीकाठच्या भागातील घरांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. लंडन अग्निशमन दलाला पूर आल्याचे जवळपास एक हजाराच्या वर कॉल्स आले.
अधिक वाचा :
पाण्याची पातळी वाढत चालल्याने अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे सिग्नलिंग प्रणालीत बिघाड झाला आहे. पबमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. याचबरोबर पुरामुळे स्थानिक पेनवर्थम गर्ल्स हाय स्कूलसुद्धा मंगळवारी बंद ठेवण्यात आले आहे.
लंडनमध्ये तुफान पाऊस पडणार असल्याने पर्यावरण संस्थेने उप्पर लंडन नदी क्षेत्रातील सात ठिकाणी पुराचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे महिन्याभराचा पाऊस सोमवारी फक्त एका तासात कोसळल्याने ही परिस्थिती उद्भवली. त्यामुळे रेनेस पार्क, दक्षिण लंडन या भागात पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत.
अधिक वाचा :
गाडी चालकांना त्यांच्या गाड्या रस्तावर सोडून जावे लागले. याचबरोबर अनेक घरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. याचबरोबर पाणी अंडरग्राऊंड स्टेशनमध्येही साचल्याने सर्कल लाईनच्या रेल्वे बेकर स्ट्रीट स्टेशनकडे वळवण्यात आल्या.
तसेच शहरातील चेल्सा स्लोन स्क्वेअर ट्युब स्टेशनच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याचे अद्भुत दृष्य पहावयास मिळाले.
हेही वाचले का?
पाहा : मुंबईतील २०० वर्ष जुन्या बंगल्यांचा व्हिडिओ