आंतरराष्ट्रीय

इंग्‍लंड : अनलॉक ४ ची प्रक्रिया होणार सुरु : मास्‍क सक्‍ती रद्‍द, सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदही उठणार

नंदू लटके

लंडन ; पुढारी ऑनलाईन : इंग्‍लंड मधील अनलॉकचा चौथा टप्‍पा सोमवार, १९ जुलैपासून सुरु होणार आहे. येथे कोरोना प्रतिबंधक नियमावलीमध्‍ये शिथिलता येणार आहे. मात्र इंग्‍लंड मध्‍ये कोरोनाचे नवे रुग्‍णवाढ आढळत असल्‍याने नागरिकांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहन सरकारच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

अधिक वाचा 

इंग्‍लंडमध्‍ये २१ जून २०२१ रोजीच 'फ्रीडम डे'ची घोषणा करण्‍यात आली होती. मात्र इंग्‍लंड मध्‍ये डेल्‍टा व्‍हेरियंटमुळे कोरोना संसर्गामध्‍ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यानंतर १९ जुलैपासून अनलॉकचा चौथ्‍था टप्‍पा सुरु होईल, असे पंतप्रधान बोरीस जॉन्‍सन यांनी जाहीर केले होते.

५ जुलैपासूनच कोरोना प्रतिबंधक नियमांमध्‍येच बदल करण्‍याचे नियोजन होते. मात्र रुग्‍णसंख्‍येत वाढ झाल्‍याने आता १९ जुलैपासून नियमांमध्‍ये शिथिलता आणण्‍याचे नियोजन असल्‍याचे गृहसचिवांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अधिक वाचा 

इंलंड मध्‍ये कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरली. मात्र लसीकरण मोहिम यशस्‍वी ठरल्‍याने आता अनलॉक-४ची प्रक्रीया सुरु केली जात आहे.

इंग्‍लंडमधील ऑनलॉकच्‍या चौथ्‍या टप्‍प्‍यात सोशल डिस्‍टसिंगचे नियम शिथिल होतील. सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती असणार नाही. मात्र आपल्‍या स्‍वत:च्‍या जबाबदारीवरच नागरिकांनी विनामास्‍क फिरावे, असे सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

देशात लॉकडाउन पूर्णपणे उठविण्‍यात आले असेल तरी अद्‍याप कोरोनाचे संकट कायम आहे.

रुग्‍ण वाढ नयेत म्‍हणून नागरिकांनी स्‍वयंशिस्‍त पाळावी.पुन्‍हा लॉकडाउनची वेळ येणार नाही, असेच वर्तन हवे, असे पंतप्रधान बोरीस जॉन्‍सन यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

इंग्‍लंडमध्‍ये आतापर्यंत ८५ टक्‍के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. सुमारे ३ कोटी ३० लाखांहून अधिक नागरिकांनी दोन्‍ही डोस घेतले आहेत.

 नियमावलीत होणार हे बदल…

  • सार्वजनिक व खासगी ठिकाणी 'वन मीटर प्‍लस' हा सोशल डिस्‍टसिंगचा नियम रद्‍द हेईल. याला अपवाद कोरोना उपचार केंद्र आणि विमानतळ असेल.
  • सार्वजनिक ठिकाणी मास्‍क सक्‍ती असणार नाही. (काही दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेचा वापर करताना मास्‍कचा वापर बंधनकारक असेल)
  • विवाह सोहळा, सार्वजनिक उत्‍सव, अंत्‍यसंस्‍कारासाठी उपस्‍थितांची मर्यादा नियम रद्‍द होईल.
  • नाईट क्‍लब सुरु होतील. ( मार्च २०२०पासून इंग्‍लंडमधील नाईट क्‍लब बंद होते)
  • सार्वजनिक उत्‍सवाला परवानगी असेल. सर्व क्रीडागणांवर प्रेक्षकांना परवानगी असेल.
  • सार्वजनिकरित्‍या धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करता येईल.
  • लसीकरण झालेल्‍या प्रौढ नागरिक कोरोना संसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात आले तरी अलगीकरणाची सक्‍ती आता राहणार नाही.

हेही वाचाल का ?

पहा व्‍हिडिओ : पुढारी आरोग्य संवाद : 'कोरोना लसीकरण, औषधोपचार आणि त्यांचे पेटंट' –
डॉ. मृदुला बेळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT