Russia on Iran Israel US conflict Putin Russia Israel relations diplomacy foreign policy Middle East tensions Russia neutrality Russian Muslims
सेंट पीटर्सबर्ग : अमेरिकेने इराणच्या अणु केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर जगभरातील देशांमधून त्याचे पडसाद उमटले. अनेकांनी अमेरिकेच्या या हल्ल्याचा निषेध नोंदवला. त्यामध्ये रशिया आणि चीन या जागतिक महासत्तांचाही समावेश आहे.
तथापि, मध्यपुर्वेत निर्माण झालेल्या या तणावपूर्ण वातावरणात आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराण-अमेरिका संघर्षात रशिया तटस्थ राहणार आहे आणि त्यामागे काही ठोस कारणे आहेत.
पुतिन म्हणाले, “इस्रायलमध्ये माजी सोव्हिएत संघ व रशियन फेडरेशनमधून सुमारे 20 लाख लोक स्थायिक झाले आहेत. त्यामुळे इस्रायल हे जवळपास रशियन भाषिक देशच झाला आहे. रशियाच्या आधुनिक इतिहासात आम्ही याचा विचार करतो.”
त्यांनी हे वक्तव्य सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये केले. तसेच त्यांनी टीकाकारांना "उत्तेजक" म्हणत बाजूला सारले आणि रशियाचे इस्लामी व अरब देशांशी दीर्घकालीन सौहार्दाचे संबंध असल्याचे सांगितले.
“रशियामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 15 टक्के आहे. शिवाय, रशिया ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (OIC) चा निरीक्षक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पुतिन यांनी असेही स्पष्ट केले की, “इराणने आमच्याकडे कोणतीही थेट मदतीची मागणी केलेली नाही.” त्यांनी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुतिन यांनी या संघर्षात मध्यस्थीची तयारी दर्शवली होती, मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ऑफर फेटाळून लावत म्हटले की, “माझ्यासाठी एक उपकार करा – आधी स्वतःच्या समस्या सोडवा, नंतर इतरांसाठी मध्यस्थी करा.”
यात ट्रम्प यांचा रोख युक्रेन युद्धाकडे आहे. दरम्यान, इराणवरील हल्ल्यानंतर चीन आणि रशियाने या हल्ल्याचा निषेध केला होता. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोला जाऊन पुतिन यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. इस्लामी जगतातूनही या हल्ल्ल्याचा निषेध केला गेला होता.
दरम्यान, अमेरिकेने नुकत्याच "ऑपरेशन मिडनाईट हॅमर" अंतर्गत इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान येथील अणुस्थळांवर 14000 किलो वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरून हल्ला केला.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे वर्णन “प्रचंड लष्करी यश” असे करताना सांगितले की, “इराणमधील आण्विक क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे.”
इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली..
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरकची यांनी म्हटले की, “आम्ही आधीच चर्चेच्या टेबलवर होतो. अमेरिका आणि इस्रायलनेच ती चर्चा उध्वस्त केली. आता प्रतिउत्तर दिल्याशिवाय कोणतीही शांतता शक्य नाही.”