Bangladesh Crisis Osman Hadi pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Bangladesh Crisis Osman Hadi: उस्मानच्या मृत्यूनंतर ढाका पुन्हा पेटले! वादग्रस्त ग्रेटर बांगलादेशचा नकाशा तयार करणारा हादी कोण होता?

बांगलादेशच्या चारही शहरांमधील भारतीय उच्चायुक्तालयातून व्हिसा देण्याचं काम बंद केलं आहे.

Anirudha Sankpal

माBangladesh Crisis Osman Hadi Death: मध्यरात्रीपासूनच बांगलादेशच्या अनेक शहरांमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. जाळपोळ, मारहाण आणि दंगल घडवून आणणाऱ्या लोकांनी भारतीय संस्थांना टार्गेट केलं आहे. चटगाँवमधील भारतीय उच्चाउक्तावर दगडफेक करण्यात आली आहे. आंदोलक भारत विरोधी घोषणाबाजी करत आहेत. आवामी लीगचे कार्यकर्ते उघड उघड हत्या करण्याची धमकी देत आहेत.

बांगलादेशच्या चारही शहरांमधील भारतीय उच्चायुक्तालयातून व्हिसा देण्याचं काम बंद केलं आहे. ढाका, राजशाही, खुलना आणि चटगाँव या शहरातील उच्चायुक्तांबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

हादी कोण होता?

बांगलादेशमध्ये मध्य रात्री आंदोलन करणाऱ्या शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार उसळला. शरीफ उस्मान हादी २०२४ मध्ये शेख हसीना यांच्याविरूद्ध झालेल्या आंदोलनतील एक प्रमुख चेहरा होता. उस्मान हादी भारताला शत्रू राष्ट्राच्या नजरेतून पाहतो. तो सतत भारत सरकार विरूद्ध विखारी भाषणे करत होता.

बांगलादेशमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शरीफ उस्मान हादी हा ढाका ८ मधून निवडणूक लढवण्यास उत्सुक होता.

हादीला १२ डिसेंबर रोजी ढाकामध्ये पलटन भागात एका बॅट्रीवर चालणाऱ्या ऑटो रिक्षामधून जात असताना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हल्ल्यानंतर त्याला आधी ढाका मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्यानंतर एवर केअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, गेल्या शनिवारी त्याला पुढच्या उपचारासाठी एअरलिफ्ट करून सिंगापूर इथं नेण्यात आलं होतं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

हादीच्या मृत्यूनंतर भारत विरोध तीव्र

हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये भारत विरोध तीव्र झाला आहे. बांगलादेशमधील भारत विरोधी गट मुद्दाम या प्रकरणात भारताला ओढण्याचा प्रयत्न करत आहे. गुरूवारी रा६ी ९.४० मिनिटांनी एक पोस्टमध्ये इन्कलाब मंचने शरीफ उस्मान हादीचे निधन झाल्याची घोषणा केली. 'भारतीय वर्चस्वाच्या विरोधात संघर्षात अल्लाहने महान क्रांतिकारी उस्मान हादी ला शहीद म्हणून स्वीकारलं आहे.' अशी पोस्ट करण्यात आली.'

शरीफ उस्मान हादी हा इन्कलाब मंचचा प्रवक्ता आणि या संघटनेचा एक संस्थापक सदस्य होता. इन्कलाब मंच एक कट्टर राजनैतिक व्यासपीठ आहे. याच संघटनेचा उदय हा शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलनात झाला आहे. ही संघटना भारत विरोधी आहे.

दरम्यान, जुलैमध्ये झालेल्या उठावावेळी त्यांनी अवामी लीगवर घटनात्मक बंदी घालण्याची मागणी केली होती. उस्मान हादीने बांगलादेशमध्ये स्वतःची कट्टर भारत विरोधी प्रतिमा तयार केली होती. त्याने अवामी लीगवरच नाही तर बांगलादेशच्या नॅशनलिस्ट पार्टीवर देखील टीका केली होती.

ग्रेटर बांगलादेशचा नकाशा केला होता तयार

बांगलादेशी माध्यामांच्या रिपोर्टनुसार हादीने नुकतेच एक कथित ग्रेटर बांगलादेशचा नकाशा तयार करून तो सर्क्युलेट केला होता. यात भारताच्याही काही भागांचा समावेश या नकाशात करण्यात आला होता. बांगलादेशमधील स्थितीवर बारीक नजर ठेवून असलेल्या जाणकारांच्या मते हादी हा कट्टर भाषा आणि संघर्षाच्या पवित्रा घेण्याने प्रसिद्ध झाला होता.

कोणी मारली गोळी

इंन्कलाब मंचने भारताला या प्रकरणात विनाकारण ओढले आहे. त्यांनी जर हादीचा मारेकरी भारतात पळून गेला तर त्याला भारत सरकारसोबत चर्चा करून कोणत्याही परिस्थिती अटक करून पुन्हा बांगलादेशात आणलं गेलं पाहिजे अशी मागणी केली आहे.

बांगलादेशमधील प्रमुख वर्तमानपत्र एक द डेली स्टार ने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत रॅपिड अॅक्शन बटालियन, पोलीस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशने आतांपर्यंत २० लोकांना ताब्यात घेतलं आहे. यातील काही जणांना चौकशीनंतर सोडून देखील देण्यात आलं आहे.

फैसल करीम मसूद मुख्य आरोपी

उस्मान हादीला गोळी मारण्याऱ्यांमध्ये फैसल करीम मसूद नावाचा व्यक्ती प्रमुख आरोपी आहे. पोलिसांनी मसूदच्या वडिलांना हुमायू कबीर आणि आई हासी बेगम, पत्नी साहेदा परवीन सामिया, सामियाचे मोठे भाऊ वाहिद अहमद शिपू, मसूदची मैत्रिण मारिया अख्तर, वाहिद अहमद शिपूचे मित्र मोहम्मद फैसल, नुरूज्जमा नोमानी उर्फ उज्वल, फैसलचे जवळचे साथीदार मोहम्मद कबीर, सिबियन डिऊ आणि संजय चिमसिम यांना अटक केली आहे.

तर फरार आरोपी आलमगीर सोबत संपर्कात असल्याच्या आरोपाखाली हबीबुर रहमान आणि मिलन हे दोघांना देखील ताब्यात घेतलं होते. बॉन्डवर लेखी हमी घेतल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT