Vladimir Putin Secret Antiaging Research: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे अनेक काळापासून रशियाचे राष्ट्रपती आहेत. त्यांचा फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय असतो. ७३ वर्षाचे व्लादिमीर पुतीन अजूनही तरूणांना लाजवेल असा फिटनेस राखून आहेत. त्यांचे घोडेस्वारी, स्विमिंग करतानाचे शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता एका रिपोर्टनुसार तरूण आणि अमर राहण्यासाठी, मानवाचे आयुष्य वाढवण्यासाटी एका वैज्ञानिक प्रयत्न देखील सुरू असल्याचे समोर आले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार रशियाने २०२४ मध्ये न्यू हेल्थ प्रिजर्वेशन टेक्नॉलॉजी नावाचा २६ अब्ज डॉलरचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. याचा उद्येश हा असे तंत्रज्ञान विकसित करायचं ज्यामुळं मनुष्याचे आयुष्य वाढेल आणि त्याच्या शरिरातील खराब झालेले अवयव बदलण्यास मदत होईल.
गेल्या वर्षी चीनमध्ये एका लष्करी परेडवेळी व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिंगपिंग यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेचा रोख मनुष्याचे आयुष्य वाढवण्याकडेच होता. त्यावेळी पुतीन म्हणाले होते की, 'मानवी अवयवांचे सतत ट्रान्सप्लांटेशन केलं जाऊ शकतं. यामुळं मनुष्याला तरूण राहण्यास मदत होईल आणि कदाचित तो अमर देखील होऊ शकतो. यावेळी जिंगपिंग यांनी या शतकाच्या शेवटीपर्यंत मनुष्याचे वय १५० वर्षांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं.
रशियाच्या या प्रोजेक्टमध्ये दोन प्रमुख टेक्नॉलॉजीवर सर्वाधिक काम होत आहे. पहिले म्हणजे बायोप्रिंटिंग म्हणजेच थ्रीडी प्रिंटरच्या मदतीनं जिवंत पेशींद्वारे अवयवांची निर्मिती. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की मानवी कार्टिलेज आणि उंदराच्या थायरॉयड ग्रंथी सारखे अवयव तयार करण्यात यश आलं आहे.
दुसरे तंत्रज्ञान म्हणजे जीन संशोधित मिनी पिग्सच्या आत मनवी अंग विकसित करणे. ज्यावेळी भविष्यात ट्रान्सप्लांटची गरज भासेल त्यावेळी हे अवयव ट्रान्सफ्लांट केले जाऊ शकतील. रशियाच्या सरकारचे २०३० पर्यंत मानवी अंगांचे ट्रान्सप्लांटेशन व्यावहारिक स्वरूपात आणायचे उद्दिष्ट आहे. रशियाने नुकतेच एका नव्या जीन थेरपीवर देखील काम करण्यास सुरूवात केली आहे. याचा उद्येश हा वय वाढण्याची प्रक्रिया संथ करणे हा आहे.
रशियातील या दोन महत्वकांक्षी प्रोजेक्टचे नेतृत्व दोन अशा व्यक्ती करत आहेत ज्या पुतीन यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. यात त्यांची मुलगी मारिया वोरोंतसोवा हिचा देखील समावेश आहे. ती एंडीक्रोनोलॉजिस्ट आणि मेडिकल रिसर्चसंदर्भाजील सरकारी उपक्रमांची देखरेख करत आहे. दुसरा मुख्य चेहरा म्हणजे मिखाईल कोवाल्चुक... यांच्याकडे रशियाच्या आयुष्य वाढवण्याच्या प्रोग्रामचे प्रमुख शिल्पकार मानलं जात आहे.
असं असलं तरी या प्रोजेक्ट बाबत काही प्रश्न देखील उपस्थित राहतात. रशिया सोडलेले शास्त्रज्ञ अलेक्झांडर ओस्त्रोवस्की यांनी सांगितलं की जर या दावांसंदर्भातील वैज्ञानिक संशोधन आणि जाहीर परिणाम समोर आळे नाहीत तर या प्रोजेक्ट्सला फक्त महत्वकांशी स्वप्न मानलं जाईल. वैज्ञानिक निधी मिळवण्यासाठी पुतीन यांना त्याच गोष्टी सांगत आहेत ज्या गोष्टी पुतीन यांनी ऐकल्या पाहिजेत.