US-Iran War Oil Price pudhari
आंतरराष्ट्रीय

US-Iran War Oil Price: अमेरिका - इराणचे एकमेकांवर रोज हल्ले तरी कच्च्या तेलाच्या किंमती कशा घसरल्या?

Anirudha Sankpal

US-Iran War Oil Price: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अजून सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आताचा त्यांचा आयआरजीसीवरचा हल्ला संपल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आयआरजीसीच्या मिलीटरी कमांड सेंटर, मिसाईल आणि ड्रोन फॅसिलिटी, कोस्टल सर्व्हिसेस आणि डिफेन्स साईटला टार्गेट केल्याचं सांगितलं. हा हल्ला इराणच्या मिसाईल्सने अमेरिकेच्या लष्कराला टार्गेट केल्यानंतर करण्यात आला होता.

जरी होर्मुझ आणि इराणमध्ये लष्करी संघर्ष तीव्र झाला असला तरी त्याचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या किंमतींवर पडलेला नाही. ब्रेंट क्रुड ऑईल हे १.२९ डॉलर किंवा १.४२ टक्क्यांनी घसरलं असून ते आता ८९.३५ डॉलरपर्यंत पोहचलं आहे. हा दर घसरण्यामागं तेलाचे टँकर्स मध्य पूर्वेतून सहज पार होत असल्याचं कारण असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे.

अमेरिकेने इराणच्या खुझेस्तान भागात हल्ले केले असून अहवाझ, अबदान, शादगन आणि अरवांदकेनर या भागात मिसाईल स्ट्राईक झाले आहेत. ही माहिती इराणच्या माध्यमांकडून देण्यात आली आहे.

या सर्व घडामोडीच इराकमध्ये देखील संघर्ष सुरू झाला आहे. इराकने महत्वाच्या ठिकाणी आपला कब्जा घेण्यास सुरूवात केली आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या लष्करी ग्रुप देशातील अनेक भागात सक्रीय झाले असून युएसचे सैन्य हे त्यांच्या लष्करी बेसमध्ये आहेत. बगदादमधून सरकारने इराकच्या हद्दीत युद्ध सुरू करण्याचे टाळा अशी विनंती केली आहे.

दरम्यान, अमेरिकेने इराणचा पाठिंबा असलेल्या लष्करी गटांनी जर अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लष्करी व्यक्ती किंवा इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला केला तर अजून मोठी लष्करी कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्या लष्करी तळावरील आमच्या सैन्याचे रक्षण करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT