US vs Iran War | इराणमध्ये घुसून अमेरिकेने आपला दुसरा पायलट सुरक्षित बाहेर काढला; IRGC सोबत जोरदार चकमक file photo
आंतरराष्ट्रीय

US vs Iran War | इराणमध्ये घुसून अमेरिकेने आपला दुसरा पायलट सुरक्षित बाहेर काढला; IRGC सोबत जोरदार चकमक

दरम्यान US आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले

पुढारी वृत्तसेवा

us army rescued second pilot of downed f-15 fighter jet inside iran

तेहरान : पुढारी ऑनलाईन

अमेरिकन सैन्याने एका धाडसी मोहिमेत इराणच्या आत जाऊन आपल्या फायटर जेटच्या पायलटचा शोध घेत त्याला सुरक्षित बाहेर काढले आहे. शुक्रवारी इराणी दलांनी अमेरिकेचे F-15E लढाऊ विमान पाडले होते. यानंतर अमेरिकेने या बेपत्‍ता पायलटची शोध मोहिम सुरू केली होती. तर दुसरीकडे इराणनेही अमेरिकन पायलटचा शोध सुरू केला होता. मात्र इराणच्या जमिनीवर अमेरिकेन सैन्याचे पाउल पडल्याने आता ही लढाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकन सैन्याने एका धाडसी कारवाईत इराणमध्ये पाडलेल्या F-15E फायटर जेटमधील दुसऱ्या पायलटलाही सुरक्षित बाहेर काढले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची पुष्टी केली आहे. यापूर्वी कतारमधील मीडिया आउटलेट अल-जझीरा यांनी एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले होते की, या बचाव मोहिमेदरम्यान इराणी दलांसोबत जोरदार गोळीबार झाला.

इराणी सुरक्षा दलांनी शुक्रवारी मध्य इराणच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेचे F-15E स्ट्राइक ईगल विमान पाडले होते. या लढाऊ विमानातील दोन्ही पायलट सुरक्षितपणे इजेक्ट झाले होते. त्यापैकी एक पायलटला अमेरिकन सैन्याने त्याच दिवशी सुरक्षित बाहेर काढले होते, तर दुसऱ्या पायलटच्या शोधासाठी ऑपरेशन सुरू होते.

इराणच्या सीमेबाहेर पायलट सुरक्षित

अल-जझीरा यांच्या अहवालानुसार, त्या क्रू मेंबरला अखेर इराणच्या सीमेबाहेर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान अमेरिकन सैन्य आणि IRGCच्या लढवय्यांमध्ये तीव्र चकमक झाली. मात्र आता अमेरिकेने थेट इराणच्या भूमित घुसून आपल्या पायलटला सुरक्षित बाहेर काढल्याने इराण आणि अमेरिकेतील संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT