US vs Iran War | इराणमध्ये घुसून वैमानिकाची सुटका; अमेरिकन सैन्याच्या विशेष दलांची कारवाई

प्रतिहल्ल्यातही मोहीम यशस्वी
US vs Iran War |
तेहरान : वैमानिकांच्या शोधासाठी आलेल्या हेलिकॉप्टरमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले.
Published on
Updated on

वॉशिंग्टन, तेहरान; वृत्तसंस्था : इराणमध्ये पाडलेल्या अमेरिकन लढाऊ विमानानंतर अमेरिकेने अत्यंत धाडसी पाऊल उचलत थेट इराणी भूमीत प्रवेश करून बचाव मोहीम राबवली. अमेरिकन विशेष दलांनी शुक्रवारी रात्री ही गुप्त कारवाई केली. इराणच्या भूमीला प्रथमच अमेरिकी सैनिकांचे त्यामुळे पाय लागले. दरम्यान, काही काळानंतर इराणने दुसरे विमान पाडले त्याच्या दोन पायलटचा शोध अद्याप लागला नाही.

अमेरिकेचे एफ-15 लढाऊ विमान पाडल्यानंतर दोन वैमानिकांनी इजेक्ट केले होते. त्यानंतर अमेरिकन विशेष दलांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेशात प्रवेश करत ‘कॉम्बॅट सर्च अँड रेस्क्यू’ मोहीम सुरू केली. या मोहिमेत हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उड्डाण करणार्‍या इंधनपुरवठा विमानांचा वापर करण्यात आला. विशेष दलांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत एका वैमानिकाला जिवंत शोधून सुरक्षित बाहेर काढले.

गोळीबारातही मिशन पूर्ण

या कारवाईदरम्यान इराणकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. अमेरिकन हेलिकॉप्टरना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांना नुकसानही झाले; मात्र सर्व यंत्रणा सुरक्षितपणे परतण्यात यशस्वी ठरली. ही मोहीम पूर्णपणे शत्रूच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात पार पडली.

तीन वैमानिक अद्याप बेपत्ता

एफ-15 या विमानातील दुसरा अमेरिकन वैमानिक अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. तर काही काळानंतर ए-10 विमान पाडले, त्याचे दोन वैमानिक अद्याप बेपत्ता आहेत. इराणने स्थानिक नागरिक आणि मिलिशियाला शोध मोहिमेत सामील केले असून त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता

या घटनेमुळे अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शत्रूच्या भूमीत अमेरिकन सैन्याने केलेला थेट प्रवेश हा युद्धातील मोठा टप्पा मानला जात आहे आणि पुढील काही दिवस परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news