US Military Operations In Ecuador: अमेरिका-इराण-इस्त्रायल या युद्धाचा भडका मध्यपूर्व आशियात उडाला आहे. अवघ्या काही दिवसात या युद्धात दोन्ही बाजूंचे हजारो लोकं मृत्यूमुखी पडले असून दिवसेंदिवस हा लष्करी संघर्ष तीव्र होत आहे. याचवेळी अमेरिकेने अजून एका देशात संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली आहे.
अमेरिकाने इक्वाडोरमध्ये दहशवादी संघटनांविरूद्ध इक्वाडोरसोबत संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली. मंगळवारी रात्री उशिरा पेंटागॉनने याबाबतची माहिती दिली. पूर्व पॅसिफिक महासागरात तसेच कॅरेबियन समुद्रात युएस लष्कराकडून एकतर्फी हल्ले सुरू करण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनानं या नावांमधून मोठ्या प्रमाणावर ड्रग्स तस्करी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार युएस आणि इक्वाडोर यांचे संयुक्त ऑपरेशन लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन समुद्रात नार्को टेररिजमच्या धोक्याविरूद्ध लढण्याबाबतची आमची प्रतिबद्धता दर्शवते. युएस स्पेशल फोर्सचे सैनिक देशभरातील संशयीत ड्रग्ज शिपमेंट फॅसिलिटी आणि ड्रग्जसंबंधीच्या दुसऱ्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात इक्वाडोरच्या कमांडोंना सल्ला आणि सहाय्य करत आहेत.
नाव न छापण्याच्या अटीवर स्पेशल ऑपरेशन्सच्या अधिकाऱ्याने सांगितलं कीस, अमेरिकेचे जवान या छापेमारीत थेट सहभाही गोत नाहीयेत. मात्र इक्वाडोरच्या सैनिकांना त्यांच्या ऑपरेशनच्या प्लॅनिंगमध्ये मदत करत आहेत. त्यांना इंटेलिजन्स आणि लॉजेस्टिक सपोर्ट देत आहेत. आम्ही सर्वजण मिळून नार्को टेररिस्टचा सामना करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत आहोत.
लष्कराचे साऊथ कमांडर जनरल फ्रांसित एल डोनोवन यांनी सांगितलं की, 'आम्ही इक्वाडोर आर्म्ड फोर्सेसच्या पुरूष आणि महिलांचे या लढाईतील त्यांच्या प्रतिबद्धतेबद्दल कौतुक करतो. त्यांनी आपल्या देशातील नार्को-टेररिस्टविरूद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यांनी या लाढाई शौर्य आणि दृढ संकल्पाचं दर्शन घडवलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑपरेशनमध्ये जास्तीजास्त इक्वाडोरचे लष्कर सामील होतं. हे मिशन यशस्वी झालं का किंवा त्याचा हेतू काय होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही. युएस साऊथ कमांडने एका वक्तव्यावत हे ऑपरेशन लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन पार्टनर्सच्या नार्को टेररिजमच्या धोक्याविरूद्ध लढण्यासाठी करण्यात आलं आहे. या ऑपरेशनची पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, व्हाईट हाऊसने या लष्करी कारवाईबाबत सध्या तरी कोणतीही कमेंट केलेली नाही.