पुढारी ऑनलाईन डेस्क : युगांडातील (Uganda) एका शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) रविवारी अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपालातील फ्रीडम सिटी मॉलमध्ये (Freedom City Mall) नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोक जमले असताना चेंगराचेंगरी झाली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मध्यरात्री लोक फटाके (Fireworks) पाहण्यासाठी बाहेर पडले तेव्हा चेंगराचेंगरी झाली. (Uganda Shopping Mall Stampede)
एएफपीने कंपाला पोलिस (Kampala Police) अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, जल्लोष संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. युगांडा पोलिस दलाने ट्विटमध्ये म्हटले आहे, "नामसुबा येथील कॅटवे प्रादेशिक फ्रीडम सिटी मॉलमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गोंधळाचा आणि त्याकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत पोलिस चौकशी करत आहे. या घटनेत किशोरवयीन मुलांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला." (Uganda Shopping Mall Stampede)
पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर पोलिस आणि स्वंयमसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. यानंतर नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिक वाचा :